पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यादरम्यान सोमवारी वडोदरा येथे पोहोचले. पंतप्रधानांनी येथे रोड शो केला. यावेळी भारतीय सैन्याच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. वडोदरा येथील पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना सुनसारा देखील सहभागी झाल्या होत्या. "पंतप्रधान मोदींना भेटून आम्हाला छान वाटलं. मोदींनी महिला सक्षमीकरणासाठी खूप काही केलं आहे. सोफिया माझी जुळी बहीण आहे. जेव्हा बहीण देशासाठी काही करते तेव्हा ती फक्त मलाच नाही तर इतरांनाही प्रेरणा देते. ती आता फक्त माझी बहीण नाही तर देशाची बहीण आहे" असं शायना सुनसारा यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचे भाऊ संजय कुरेशी म्हणाले की, "पंतप्रधान मोदींचे येथे आगमन हा एक अद्भुत क्षण होता. आम्हाला त्यांना पहिल्यांदाच पाहता आलं. माझ्या बहिणीला ही संधी दिल्याबद्दल मी आपल्या संरक्षण दलांचे आणि भारत सरकारचे आभार मानतो. ज्या महिलांनी इतकं दुःख सहन केले आहे त्यांचा बदला एक महिला घेत आहे यापेक्षा चांगलं काय असू शकतं?"
"माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Vyomika Singh) या दोन्ही महिला अधिकारींनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलं. यासोबतच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा कसा खात्मा करत आहे हे देखील सांगितलं.
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान
कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली तेव्हा त्यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या होत्या. सोफिया यांचा त्यांना अभिमान वाटत आहे. “देशासाठी काहीतरी करण्याची तिचं नेहमीच ध्येय होतं. तिला डीआरडीओमध्ये सामील व्हायचं होतं, शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायचं होतं. तिला अमेरिकेतूनही अनेक ऑफर आल्या होत्या, पण तिला भारतात राहून सैन्यात भरती व्हायचं होतं. ती पहिल्याच प्रयत्नात सैन्यात सामील झाली. सुरुवातीला माझं स्वप्न सैन्यात भरती होण्याचं होतं, पण एनसीसीमध्ये असूनही आणि सर्व प्रयत्न करूनही माझी निवड झाली नाही. मला अजूनही वाईट वाटतं, पण जेव्हा मी सोफियाला वर्दीत पाहते तेव्हा असं वाटतं की मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगत आहे” असं शायना यांनी म्हटलं आहे.