शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 17:19 IST

'हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता.'

PM Modi on Ram Mandir : पीएम नरेंद्र मोदींनी आज(दि.22) गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील तारभ येथील वलीनाथ महादेव मंदिराचे उद्घाटन केले. महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात जनतेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज देवाचे आणि देशाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. यावेळी राम मंदिराचा उल्लेख करत पंतप्रधानांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेसचे नेते नकारात्मकतेच्या भावनेत जगत आहेत. अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधले गेले आहे, तरीदेखील त्यांचे नेते द्वेषाचा मार्ग सोडण्यास तयार नाहीत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता आणि मंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आता भगवान श्रीरामाच्या जन्मभूमीत भव्य मंदिर बांधले गेले आहे. यामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. तरीदेखील हे लोक नकारात्मकता आणि द्वेषाचा मार्ग सोडत नाहीत. एकीकडे देशात मंदिरे बांधली जात आहेत तर दुसरीकडे गरिबांसाठी लाखो घरेही बांधली जात आहेत, असंही मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी 8,350 कोटींहून अधिकच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

विरोधकांचा राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कारगेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्याला हजारो लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. यात विरोधी पक्षांचाही समावेश होता. पण, राम मंदिर सोहळा भाजपचा कार्यक्रम असल्याची टीका करत विरोधकांनी या सोहळ्यात न जाण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण