शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

दणका ट्रम्पना अन् फायदा मोदींना; पंतप्रधानांच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 3:58 PM

चिथावणीखोर ट्विटमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचं ट्विटर खातं बंद

नवी दिल्ली: अमेरिकेचे मावळते पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेबाहेर घातलेल्या गोंधळामुळे ट्विटरनं ही कारवाई केली. ट्रम्प यांनी ट्विटमध्ये वापरलेली भाषा चिथावणीखोर असल्यानं ट्विटरनं ट्रम्प यांचं खातं बंद केलं. ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. ट्रम्प यांचं खातं बंद करण्यात आल्यानं आता पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते झाले आहेत. ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स असण्याचा मान थोड्या दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होता. मात्र ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यात आल्यानं आता हा मान मोदींना मिळाला आहे. समर्थकांना हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यानं ट्विटरनं ट्रम्प यांना जोरदार दणका दिला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी ट्विटर खात्याला ८८.७ मिलियन म्हणजेच ८ कोटी ८७ लाख लोक फॉलो करतात. सर्वाधिक ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीत थोड्याच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ६४.७ मिलियन म्हणजेच ६ कोटी ४७ लाख इतकी आहे. मात्र आता ट्रम्प यांचं खातंच बंद करण्यात आल्यानं मोदी ट्विटवर सर्वाधिक फॉलो असलेले नेते झाले आहेत.अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी धुमाकूळ घातला. ट्रम्प यांनी चिथावणी दिल्यानंच हा प्रकार घडल्याचा आरोप झाला. त्यामुळे ट्विटरनं ट्रम्प यांचं ट्विट काढून टाकत त्यांना ब्लॉक केलं. त्यानंतर त्यांचं खातं कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई केली. डोनाल्ड ट्रम्प त्यांचं खातं चिथावणी देण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांचं खातं बंद करत असल्याची माहिती ट्विटरनं दिली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी