शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

संस्कृती, पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी पंतप्रधान उत्सुक: गजेंद्रसिंह शेखावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:25 IST

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा व लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

 लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संस्कृती आणि पर्यटनाला जगात सर्वोच्च पातळीवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यात भारतीय संस्कृती आणि परंपरेचे भव्य दर्शन संपूर्ण जगाला घडविले, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा व लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

बुधवारी, ६ मार्च रोजी झालेल्या या बैठकीत भारतीय संस्कृती आणि पर्यटनाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा झाली. गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले की, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयाने महाकुंभ मेळ्यात 'कलाग्राम' नावाचे एक सांस्कृतिक गाव उभारले. महाकुंभाच्या समृद्ध वारशाचे दर्शन त्यात घडविण्यात आले. हा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा आहे. महाकुंभ मेळ्यात कोट्यवधी लोक आले. त्यांनी महाकुंभमधील स्टॉलना भेट दिली. भारताच्या गेल्या दोन हजार वर्षांपासूनच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन या कलाग्राममधून लोकांना झाले.

पर्यटन हा राज्यांच्या सूचीतील विषय आहे. मात्र, केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनवृद्धीसाठी उत्तम धोरणे राबवत आहे. शेखावत यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पर्यटन क्षेत्राचा आणखी विकास होईल, असा विश्वास डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केला.दिल्लीमध्ये येत्या १२ एप्रिल रोजी लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभ होणार आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण डॉ. विजय दर्डा यांनी दिले. सिंगापूरमध्ये नुकत्याच झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेंशनवरील कॉफी टेबल पुस्तक डॉ. विजय दर्डा यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेट दिले.

‘सेवाग्रामला जागतिक ओळख मिळवून द्या’

महात्मा गांधी यांचा आश्रम असलेले सेवाग्राम हे ठिकाण अजूनही जगासमोर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ठळकपणे समोर आलेले नाही. सेवाग्रामला जागतिक ओळख मिळवून द्यावी, अशी विनंती डॉ. विजय दर्डा यांनी शेखावत यांना केली.

 

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमत