शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 19:31 IST

PM Modi Kashmir Visit : जम्मू-काश्मीर दौऱ्यात पीएम मोदी 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

PM Modi Kashmir Visit : उद्या, म्हणजेच 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारीच श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. यादरम्यान पीएम मोदी विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणारयासोबतच ते 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यावेळी ते 1800 कोटी रुपयांच्या कृषी आणि संलग्न क्षेत्र सुधारणा प्रकल्प लॉन्च करतील. 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमधील 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासह त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल.

राज्यात कडक सुरक्षा व्यवस्थापंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी दल सरोवराच्या काठावर 7,000 हून अधिक लोक योगासने करण्यासाठी येतील. पंतप्रधानांचा दौरा शांततेत पार पडावा, यासाठी श्रीनगर शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. श्रीनगर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने येथे ड्रोन चालविण्यास बंदी घातली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाYogaयोगासने प्रकार व फायदे