शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

PM Modi Karnataka Visit: 'HAL चे नाव घेऊन लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले...' PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:58 IST

PM Modi Karnataka Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये HAL हेलिकॉप्टर फॅक्टरीचे उद्घाटन केले.

PM Modi Inaugurates HAL: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (6 फेब्रुवारी) कर्नाटकातील तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले. लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरचे अनावरणही यावेळी करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आज तुमकुरूला देशातील खूप मोठा हेलिकॉप्टर कारखाना मिळाला आहे. तुमाकुरु इंडस्ट्रियल टाऊनशिपचीही पायाभरणी झाली. 

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, 'भाजप सरकारवर खोटे आरोप लावण्यासाठी याच HAL चा वापर केला गेला होता. याच एचएएल नावाने लोकांना भडकवण्याचे कारस्थान रचले गेले होते. यात संसदेच्या कामकाजाचे अनेक तास वाया गेले. पण कितीही खोठे आरोप केले तरी एक दिवस सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. एचएएलचा हेलिकॉप्टर कारखाना आणि त्याची वाढती शक्ती खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश करेल', अशी टीका पंतप्रधानांनी केली. 2018 मध्ये राहुल गांधींनी बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी सरकारवर एचएएलचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

कर्नाटक संतांची भूमीपीएम मोदी पुढे म्हणाले की, 'कर्नाटक ही संतांची भूमी आहे. संतांच्या आशीर्वादाने आज शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी, कर्नाटकातील तरुणांना रोजगार, ग्रामस्थ आणि महिलांना सुविधा उपलब्ध करून देणे, देशाचे सैन्य बळकट करणे आणि मेड इन इंडिया या प्रकल्पांचे उद्घाटन झाले. डबल इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांची पहिली पसंती दिली आहे. राष्ट्र प्रथम या भावनेने काम केले की यश मिळते. आपल्या संरक्षण गरजांसाठी आपल्याला परदेशावरील आपले अवलंबित्व कमी करावे लागेल.' 

'आज अशी शेकडो शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे आहेत, जी फक्त भारतातच बनवली जात आहेत. याचा वापर आपले सैन्य करत आहेत. कर्नाटक ही तरुण प्रतिभा, तरुण नवनिर्मितीची भूमी आहे. ड्रोन निर्मितीपासून तेजस लढाऊ विमाने बनवण्यापर्यंत, कर्नाटकच्या उत्पादन क्षेत्राची ताकद जग पाहत आहे. गेल्या 8 वर्षांत आम्ही खाजगी क्षेत्रासाठीही दरवाजे उघडले आहेत. आज आधुनिक अ‍ॅसॉल्ट रायफल्सपासून रणगाडे, नौदलासाठी विमानवाहू युद्धनौका, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, वाहतूक विमाने भारत स्वत: तयार करत आहे. आगामी काळात तुमकुरूमध्ये शेकडो हेलिकॉप्टर तयार होणार असून त्यामुळे सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होणार आहे, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटक