शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'जुन्या इमारती गुलामगिरीच्या प्रतीक होत्या', पीएम मोदींनी केले सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:37 IST

PM Modi Inaugurates Seva Teerth: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवीन PMO ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवन-1, 2 चे उद्घाटन केले.

PM Narendra Modi Inaugurates Seva Teerth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.13) राजधानी दिल्लीतील नवीन PMO ‘सेवा तीर्थ’, तसेच कर्तव्य भवन-1 आणि कर्तव्य भवन-2 या प्रशासकीय संकुलांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हा क्षण भारताच्या विकास यात्रेतील नवा अध्याय असल्याचे सांगत, गुलामीच्या प्रतीकांपासून मुक्त होत देश नव्या इतिहासाची निर्मिती करत असल्याचे अधोरेखित केले.

इतिहास घडताना आपण पाहतोय- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण आज इतिहास घडताना पाहत आहोत. साउथ ब्लॉक हा ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होता. आता गुलामीची चिन्हे दूर केली जात आहेत. राजपथ आज कर्तव्य पथ म्हणून ओळखला जातो. मुघल गार्डनचे ‘अमृत उद्यान’ झाले, तर जुन्या संसद भवनाचे ‘संविधान भवन’ नामकरण करण्यात आले.

जुने PMO, नॉर्थ-साउथ ब्लॉकवर भाष्य

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक या इमारती ब्रिटिश साम्राज्याच्या मानसिकतेचे प्रतीक होत्या. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर याच इमारतींमधून देशासाठी महत्त्वाचे निर्णय झाले, धोरणे आखली गेली. पण या इमारती भारताला गुलामीच्या जाळ्यात ठेवण्यासाठी उभारल्या गेल्या होत्या. आज हा दिवस भारताच्या विकास यात्रेत नव्या सुरुवातीचा साक्षीदार ठरत आहे.

‘विकसित भारत’च्या संकल्पासह नवा प्रवेश

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आज आपण ‘विकसित भारत’च्या संकल्पासह सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहोत. ईश्वरी आशीर्वादामुळे आपली उद्दिष्टे साध्य करण्याची ताकद आपल्याला मिळत आहे. विक्रम संवत 2082, फाल्गुन कृष्ण पक्षातील विजया एकादशीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम झाल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, शास्त्रांनुसार या दिवशी घेतलेला संकल्प विजयाकडे घेऊन जातो. आज भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार आहे; नवे व्यापार करार संधींची दारे उघडत आहेत. अशा वेळी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन देशाच्या उद्दिष्टपूर्तीत मोठी भूमिका बजावतील.

नॉर्थ-साउथ ब्लॉक होणार संग्रहालय

या बदलांदरम्यान जुन्या इमारतींचे ऐतिहासिक महत्त्व जपले जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जुन्या इमारतींमध्ये घेतलेले निर्णय आणि त्या परिसरातील आठवणी कायम राहतील. त्यामुळे नॉर्थ आणि साउथ ब्लॉकचे रूपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सेवा तीर्थ’, नव्या प्रशासकीय युगाची ओळख

‘सेवा तीर्थ’चा अर्थ सेवेचे स्थान असा असून, याचे आधीचे नाव ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ होते. 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचे नामकरण ‘सेवा तीर्थ’ असे करण्यात आले. हे संकुल नवी दिल्लीतील दारा शिकोह रोड परिसरात आहे.

कर्तव्य भवन-1 आणि 2 मध्ये कोणती मंत्रालये?

  • वित्त मंत्रालय
  • संरक्षण मंत्रालय
  • आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
  • शिक्षण मंत्रालय
  • संस्कृती मंत्रालय
  • विधी व न्याय मंत्रालय
  • माहिती व प्रसारण मंत्रालय
  • कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
  • रसायन व खत मंत्रालय
  • जनजातीय कार्य मंत्रालय
English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi inaugurates Seva Teerth, says old buildings symbolized slavery

Web Summary : PM Modi inaugurated Seva Teerth and Kartavya Bhavan, calling it a new chapter. He stated old buildings reflected a slave mindset. North and South Blocks will become museums, preserving history. New PMO is Seva Teerth, embodying service.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपा