शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 3:45 AM

दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पास पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती.

नवी दिल्ली : चेन्नई ते अंदमान-निकोबारदरम्यान २३०० कि.मी. लांबीच्या अत्याधुनिक सबमरीन आॅप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण होणार आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) च्या देखरेखीत हा प्रकल्प पूर्ण झाला. मराठी अधिकारी विलास बुरडे या संस्थेचे संचालक आहेत. सबमरीन केबलमुळे चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड व रंगत हे आठ द्वीपसमूह जोडले जातील. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल, लँडलाईन दूरसंचार सेवा अत्यंत जलद होईल. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पास पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती.चेन्नई ते पोर्ट ब्लेअरदरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ ७ २०० जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ ७ १०० जीबीपीएस असणार आहे. ४ जी मोबाईल सेवेत मोठी सुधारणा त्यामुळे होईल. कनेक्टिव्हिटी वाढल्याने या बेटांवर पर्यटन उद्योग वाढेल. स्थानिर्कांचे जीवनमान उंचावेल. टेलिमेडिसिन , टेली-एज्युकेशन व ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील. बीएसएनएलने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटस् इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १२२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.‘यूएसओएफ’ची कामगिरी : मराठी अधिकारी विलास बुरडे संस्थेचे संचालकमाहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) वर या प्रकल्पाची जबाबदारी होती.2016 पासून बुरडे याच संस्थेचे संचालक आहेत.1995 मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत बुरडे यांची निवड झाली. मुंबई, ठाणे, नाशिक व सुरत येथेही त्यांनी काम केले.2013 मध्ये दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (ररउ) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर आले. दिल्लीस्थित बुरडे पुढचे पाऊल या मराठी अधिकाऱ्यांच्या संघटनेतही सक्रिय आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी