शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:25 IST

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत २७ देशांकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

PM Narendra Modi:पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आतापर्यंत २७ देशांकडून आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या यादीतील नवीन नाव आफ्रिकन देश नामिबियाचे आहे. पंतप्रधान मोदींना बुधवारी नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला. नामिबियाचे अध्यक्ष नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी विंडहोक येथे झालेल्या समारंभात पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. 

विशेष म्हणजे, मे २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून हा त्यांचा २७ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तसेच, त्यांच्या सध्याच्या परदेश दौऱ्यात त्यांना देण्यात आलेला हा चौथा पुरस्कार आहे. 

२०१६ मध्ये ही मालिका सुरू झालीपंतप्रधान मोदींना ११ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत २७ देशांनी सन्मानित केले आहे. हा सन्मान मिळण्याची प्रक्रिया २०१६ मध्ये सुरू झाली. म्हणजेच, ९ वर्षांच्या आत पंतप्रधान मोदींना हे २७ पुरस्कार मिळाले आहेत. तर, २०२५ सुरू झाल्यापासून गेल्या ७ महिन्यात ७ पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये त्यांना ६ देशांकडून सन्मान मिळाले होते.

गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदींना मध्य पूर्वेपासून युरोप आणि आफ्रिकेपर्यंतच्या देशांनी सन्मानित केले आहे. या सन्मानांमध्ये सौदी अरेबियाने दिलेला ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज आणि अफगाणिस्तानने दिलेला ऑर्डर ऑफ अमानुल्ला खान यांचा समावेश आहे. हे दोन्ही पुरस्कार २०१६ मध्ये देण्यात आले. तर, २०१८ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन, त्यानंतर २०१९ मध्ये मालदीवने दिलेला ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ इज्जुद्दीन आणि त्याच वर्षी नंतर बहरीनने दिलेला किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्सचा समावेश आहे. 

तसेच, २०२३ मध्ये त्यांना इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल आणि फ्रान्सच्या लीजन डी'ऑनरने सन्मानित करण्यात आले. २०२४ मध्येही हाच ट्रेंड कायम राहिला जेव्हा त्यांना सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

८ मुस्लिम देशांकडूनही सन्मान मिळाले पंतप्रधान मोदींना ज्या २७ देशांकडून पुरस्कार मिळाले आहेत, त्यात ८ मुस्लिम देश आहेत. यात कुवेत, इजिप्त, बहरीन, मालदीव, युएई, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया हे देश आहेत.

पंतप्रधान मोदींना कोणत्या देशांनी कधी सन्मानित केले?

२०१६- सौदी अरेबिया, अफगाणिस्तान

२०१९- बहरीन, मालदीव, युएई

२०२०- अमेरिका

२०२१- भूतान

२०२३- ग्रीस, फ्रान्स, इजिप्त, पलाऊ, पापुआ न्यू गिनी, फिजी

२०२४- कुवेत, गयाना, बार्बाडोस, नायजेरिया, डोमिनिका, रशिया

२०२५- नामिबिया, ब्राझील, त्रिनिदाद आणि टोबॅगो, घाना, सायप्रस, श्रीलंका, मॉरिशस

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपाprime ministerपंतप्रधान