शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चोरांची जमात चौकीदाराला हटवू पाहतेय- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 21:12 IST

राफेल डीलवरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार

भुवनेश्वर: काँग्रेसनं देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीराफेल डीलवरून पलटवार केला आहे. काँग्रेसकडून संसदेसारख्या पवित्र वास्तूचा वापर स्वत:च्या मनोरंजनासाठी केला जात आहे. त्यांचा हा प्रयत्न संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी हाणून पाडला, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते ओदिशातील बारिपदामध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. 'देशवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्यांना, देशाच्या सुरक्षेबद्दल हलगर्जीपणा करणाऱ्यांना, आपल्या मनोरंजनासाठी पवित्र संसदेचा वापर करणाऱ्यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उघडं पाडलं आहे. 2004 ते 2014 या कालावधीत केंद्र सरकारनं देशाच्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कट रचला. आता आमचं सरकार या कट कारस्थानातून देशाला बाहेर काढू पाहतं आहे. मात्र हे त्यांच्या डोळ्यात खुपतं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. भाजपा सरकारच्या काळात नामदारांची अनेक रहस्यं उलगडत आहेत. त्यामुळेच त्यांना आमचं सरकार खटकत आहे, असं मोदी म्हणाले. 'हेलिकॉप्टर घोटाळ्यातील मध्यस्त मिशेलला परदेशात भारतात आणण्यात आलं आहे. त्याच्या चिठ्ठीतून अनेक काँग्रेस नेत्यांची नावं समोर येत आहेत. मिशेल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना, मंत्र्यांना ओळखतो. पंतप्रधान कार्यालयात कोणत्या फाईल्स जात होत्या, कोणते निर्णय घेतले जात होते, याची जितकी माहिती या मध्यस्ताला होती, तितकी कदाचित त्यावेळच्या पंतप्रधानांकडेही नसेल,' अशा शब्दांमध्ये मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील