शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:45 IST

केंद्र सरकारने आज जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने जनगणाना घेण्याचा निर्णय घेतला होता. आज(दि.१६) जनगणनेचे राजपत्र जारी करण्यात आले. मात्र, आता काँग्रेसने यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बहुचर्चित १६ व्या जनगणनेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, परंतु ती 'खोदा पहाड़, निकली चुहिया' अशाप्रकारची आहे. कारण, त्यात ३० एप्रिल २०२५ रोजी जाहीर केलेल्या गोष्टींचाच पुनरुच्चार आहे.

मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले, आज आलेल्या अधिसूचनेत नवीन काय आहे ? या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये ऑक्टोबर २०२६ मध्ये आणि भारतातील इतर राज्यांमध्ये मार्च २०२७ मध्ये जनगणना केली जाईल. आजच्या अधिसूचनेत ३० एप्रिल रोजी जाहीर केलेली तीच गोष्ट पुन्हा एकदा सांगितली गेली आहे. पण, त्यात फक्त जनगणनेचा उल्लेख आहे, जातीय जनगणनेचा नाही. जातीचा उल्लेख का नाही?  पंतप्रधान मोदींनी त्यांचे मत बदलले आहे का?

पंतप्रधान मोदी २८ एप्रिल २०२४ रोजी म्हणतात - जातींय जनगणनेबद्दल बोलणाऱ्यांची विचारसरणी 'शहरी नक्षलवादा'ची आहे. मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन म्हटले होते की, आम्ही जातींय जनगणना करणार नाही. हे आमच्या धोरणाविरुद्ध आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर मोदी सरकारने म्हटले होते की, आम्ही जातींची जनगणना करणार नाही, आम्ही त्याचा विरोध करतो. पण अचानक सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी यू-टर्न घेतला आणि जातीय जनगणना करण्याची घोषणा केली. म्हणजेच, काँग्रेस पक्ष, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दबावाखाली सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

जयराम रमेश पुढे म्हणतात, आपल्या संविधानात जनगणनेची जबाबदारी केंद्र सरकारवर देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आमची मागणी अशी आहे की, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जातीय जनगणनेत 'तेलंगणा मॉडेल' स्वीकारले जावे. या अधिसूचनेत जातीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यात किती प्रश्न असतील आणि सामाजिक, आर्थिक स्थितीवरही प्रश्न असतील का? याचा उल्लेख नाही. शिवाय, यामध्ये कोणतीही अंतिम मुदत नाही. मोदी सरकारने केवळ बातम्यांसाठी ही अधिसूचना जारी केली आहे. आम्ही 'तेलंगणा मॉडेल' राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले जावे यासाठी दबाव आणत राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी