शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना दिली 'डेडलाइन'! मंत्रिपरिषदेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 10:23 IST

PM मोदींनी मंत्रिपरिषदेचे फोटोही केले ट्विट

Pm Modi in meeting with the Council of Ministers: 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चां दरम्यान, पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या टीमसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. प्रगती मैदानावर असलेल्या नवीन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'मंत्र्यांच्या बैठकीत फलदायी चर्चा झाली, जिथे आम्ही अनेक धोरणात्मक मुद्द्यांवर विचारांची देवाण घेवाण केली.' त्यांनी यासंबंधीचे फोटो शेअर केले. यातील एका फोटोत सर्व मंत्री स्क्रीनकडे बघताना दिसले तर दुसऱ्या फोटोत ते पंतप्रधानांचे विचार ऐकताना दिसले.

सामान्यत: मंत्रिपरिषदेच्या बैठकीत काही मंत्रालये त्यांच्या कामाचे सादरीकरण करतात आणि पंतप्रधान त्यांचे विचार मांडतात. सोमवारच्या बैठकीतही सरकारी खर्च, पंतप्रधानांचा अमेरिका आणि इजिप्त दौरा, असे तीन गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी व्हिजन 2047 वर लक्ष केंद्रित करण्यात आले. केंद्रीय मंत्री परिषदेची या वर्षातील ही दुसरी बैठक आहे. जानेवारीत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पंतप्रधानांनी अशीच एक बैठक घेतली होती. सोमवारी झालेल्या बैठकीत 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्याने पंतप्रधानांनी मंत्र्यांना काम पूर्ण करण्याची मुदतही दिली आहे.

२६ जानेवारी पर्यंत प्रकल्प पूर्ण करा!

पंतप्रधानांच्या भेटीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2024 च्या निवडणुका लक्षात घेता त्यांनी मंत्र्यांना सध्या सुरू असलेले बहुतांश प्रकल्प लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहेत. 26 जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, जेणेकरून त्यांचे लोकार्पण करता येईल, असे पंतप्रधान म्हणाले. ही मुदत देण्यात आली आहे कारण भारतीय प्रजासत्ताकाचे ७५ वे वर्ष सुरू झाल्यावर इतर कार्यक्रमही सुरू होतील. आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला आपले यशदेखील मांडायचे आहे. आगामी निवडणुकांवर विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी 'व्हिजन 2047'वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यांनी मंत्री आणि उच्च अधिकार्‍यांना केवळ धोरणे न बनवता त्यांच्या अमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

नवीन अधिवेशन केंद्रात सचिवांच्या उपस्थितीने मंत्रिपरिषदेत फेरबदलाची चिंता असलेल्या काही मंत्र्यांची चिंता कमी झाली. मात्र, संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही चिंता कायम राहणार आहे. पंतप्रधान मोदींनी शेवटचे फेरबदल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार  2021 मध्ये केला. नंतर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली. 2021 मध्ये मोदींनी 36 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले होते, तर 12 तत्कालीन मंत्र्यांना कार्यमुक्त केले होते. कार्यमुक्त झालेल्या मंत्र्यांमध्ये डीव्ही सदानंद गौडा, रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल निशंक, प्रकाश जावडेकर, संतोष गंगवार, बाबुल सुप्रियो, हर्षवर्धन यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात मोदींनी अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया आणि भूपेंद्र यादव या नेत्यांचा समावेश केला. याशिवाय अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि मनसुख मांडविया यांना प्रमोशन मिळाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्री