शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

''नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेते, त्यांना अश्रूंसाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज नाही''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 13:33 IST

नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरजच लागत नाही

विसावदर (गुजरात): कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावूक भाषणांवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता आहेत असं राहुल गांधी म्हणाले. गुजरातच्या सावरकुंडला येथे एका रॅलीमध्ये बोलताना राहुल यांनी मोदींवर टीका केली.    

नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरजच लागत नाही असं राहुल म्हणाले. गुजरात निवडणुकांच्या दोन-तीन दिवस अगोदर या अभिनेत्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येतील. ते सर्व मुद्द्यांवर बोलतील पण कर्जमाफी झाली की नाही, गुजरातमधील शेतक-यांना उत्पादनाचे किती पैसे मिळतात यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार नाहीत.  गुजरात माझी आई आहे आणि मी गुजरातचा मुलगा असं निवडणूक प्रचारादरम्यान एका भाषणात मोदी म्हणाले होते.  नोटबंदी नंतरच्या एका भाषणात, जर मी काळा पैसा परत आणला नाही तर लोक मला सुळावर लटकवतील असं मोदी म्हणाले होते.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन