शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शहरी बेरोजगारांना नोकरी अन् युनिव्हर्सल इन्कमचं बेनिफिट; तरुणांसाठी असा आहे मोदी सरकारचा अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:25 AM

बेरोजगारी आणि इन्कम तुटीच्या समस्येवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर मोदी सरकार काम करत आहे.

नवी दिल्ली-

बेरोजगारी आणि वेतन तुटीच्या समस्येवर तोडगा कसा काढला जाऊ शकतो यावर मोदी सरकार काम करत आहे. यात पंतप्रधानांना आर्थिक मुद्द्यांवर सल्ला देणाऱ्या समितीनं काही सल्ले दिले आहेत. शहरी बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी एखादी योजना लाँच करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला इकोनॉमिक अॅडव्हायझरी काऊन्सिलनं पंतप्रधानांना दिला आहे. यासोबतच मिळकतीतील तुट कमी करण्यासाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीमवर काम करण्याची गरज आहे. 

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार किमान मिळकतीत वाढ करण्यासोबतच सरकारनं सोशल सेक्टरवर अधिक खर्च करणं गरजेचं आहे. ज्यामुळे अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांमुळे लोकांना गरीबीच्या दरीत ढकललं जाण्यापासून वाचवता येईल. 

The State of Inequality in India नावानं संबंधित रिपोर्ट EAC चे चेअरमन विवेक देबरॉय यांनी बुधावारी सादर केला आहे. रिपोर्ट सादर करताना देबरॉय यांनी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील मजुरांना काम मिळण्याचं आश्वासन देण्यासंबंधी विचार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण शहरात मनरेगा सारख्या समकालीन योजनांमध्ये आवश्यकतेनुसार काम मिळतं आणि यामुळे अडचणी येतात. यासोबतच विवेक देबरॉय यांनी किमान वेतन वाढविण्यासाठी आणि युनिव्हर्सल बेसिक इन्कम देण्यास सुरुवात करण्याची मागणी केली आहे. 

२०१७ साली समोर आली होती बेसिक इन्कमची कल्पनायुनिर्व्हसल बेसिक इन्कमची संकल्पना याआधी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी आर्थिक वर्ष २०१७ मध्ये आर्थिक सर्व्हेक्षणात दिली होती. २०१८ साली देखील केंद्र सरकार Universal Basic Income स्कीम आणणार असल्याची चर्चा समोर आली होती. यात शेतकरी, व्यापारी आणि बेरोजगार युवांचा समावेश करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला २ हजार ते २,५०० रुपये दरमहा दिले जाण्याचं नमूद करण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात ही योजना अद्याप लागू होऊ शकलेली नाही. 

तत्कालीन अर्थमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी या योजनेला पाठिंबा दिला होता. पण राजकीय दृष्ट्या ती अंमलात आणणं शक्यत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. कारण सद्यस्थितीत उपलब्ध असलेली सब्सिडी बंद न करण्याची मागणी खासदार लोकसभेत करू लागतील असं ते स्पष्टपणे म्हणाले होते. 

ऑक्टोबर २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही UBI योजनेला समर्थन दिलं होतं. अन्न आणि तेलावर दिली जाणारी सबसिडी रद्द करुन संबंधित योजना सुरू करता येऊ शकेल असं नाणेनिधीनं म्हटलं होतं. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनीही UBI चा उल्लेख केला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना लागू करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं होतं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसाय