शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींची कोरोनाच्या संकटाविषयी मंत्री अन् अधिकाऱ्यांशी चर्चा; 5 राज्यांनी टेन्शन वाढवलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 7:58 PM

या बैठकीत साथीच्या आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून, कोरोनाशी लढा देण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्येष्ठ मंत्री आणि अधिका-यांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत साथीच्या आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून, कोरोनाशी लढा देण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांनी दिल्लीसह देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, आयसीएमआरचे डीजीही या बैठकीस उपस्थित होते.विनोद पॉल यांनी केले सादरीकरण दरम्यान, एनआयटीआय आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी सद्यस्थिती व कोरोना विषाणूच्या संसर्गाची संभाव्य परिस्थिती यावर सादरीकरण(प्रेझेंटेशन) केले. कोरोना संसर्गाची दोन तृतीयांश प्रकरणे पाच राज्यात आहेत आणि त्या राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मोठ्या शहरांमध्ये हे आव्हान पेलण्यासाठी चाचण्या, बेड आणि आरोग्य सुविधांची संख्या वाढविण्यावर या बैठकीत चर्चा झाली.या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शहर व जिल्हा रुग्णालयातील बेड/विलगीकरण कक्षातील बेड्सच्या आवश्यकतेनुसार आलेल्या शिफारशींकडे लक्ष वेधले. तसेच आवश्यकतेनुसार आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांना राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा सल्लामसलत करून आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याची सुरुवात लक्षात घेता योग्य ती तयारी करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी मंत्रालयाला दिला आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपत्कालीन बैठक बोलावण्याची गरज- पंतप्रधानया कालावधीत दिल्लीतील कोरोना विषाणूच्या परिस्थितीवरही चर्चा झाली आणि पुढील 2 महिन्यांपर्यंतच्या परिस्थितीच्या अंदाजांवरही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले की, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर, दिल्ली सरकारचे एनसीटी, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकांच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक बोलावून एकत्रित योजना तयार करावी. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे उद्भवलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्याविषयी सविस्तर चर्चा व्हायला हवी. या काळात, कोरोनाला हरवण्यासाठी अनेक राज्ये, जिल्हे आणि शहरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांचे कौतुकही केले गेले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी