पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार १८ हजार कोटी रुपये!

By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 10:29 AM2020-12-25T10:29:05+5:302020-12-25T10:31:36+5:30

पंतप्रधान मोदी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. 

pm Modi to deposit Rs 18000 crore in 9 crore farmers accounts today | पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार १८ हजार कोटी रुपये!

पंतप्रधान मोदी आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार १८ हजार कोटी रुपये!

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदी आज चार राज्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाददेशात आज ठिकठिकाणी 'किसान चौपाल'शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता पाठवणार आहेत. याअंतर्गत देशातील एकूण ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८ हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. 

पंतप्रधान मोदी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. यानिमित्तानं पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा ७ वा हप्ता भेट देणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेबाबतची माहिती आणि काही आठवणी पंतप्रधान मोदी यावेळी शेतकऱ्यांना सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर देखील उपस्थित असणार आहेत. 

देशात ठिकठिकाणी 'किसान चौपाल'
पंतप्रधान मोदींच्या संबोधनासाठी देशाच्या विविध क्षेत्रात भाजपचे मंत्री आणि खासदार कामाला लागले आहेत. भाजपने या कार्यक्रमासाठी 'किसाम चौपाल' तयार केले आहेत. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमास सामील होण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Read in English

Web Title: pm Modi to deposit Rs 18000 crore in 9 crore farmers accounts today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.