शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी खास माणसाला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत; गुजरात कनेक्शन पुन्हा येणार कामी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 13:04 IST

सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हजारो जणांचा जीव गेला. उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती पाहायला मिळाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं सत्ताधारी आमदारांचा प्राण गेल्याची घटना घडली. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची प्रतिमा डागाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर परिणाम झाल्यानं भाजपनं वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू केल्या आहेत.उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. योगींच्या मंत्रिमंडळात लवकरच बदल अपेक्षित आहेत. प्रशासनातून राजकारणात आलेल्या अरविंद कुमार शर्मांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. योगींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होऊ शकतो. त्यामध्ये पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ए. के. शर्मांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. ते गुजरात केडरचे आयएएस अधिकारी होते. पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीय व्यक्तींमध्ये त्यांची गणना होती.लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येचए. के. शर्मा विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना आमदारकी मिळाल्यापासूनच उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा त्यांची निवड करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वीच शर्मा यांच्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. त्यानंतर शर्मा दिल्लीला गेले. त्यांनी मोदींची भेट घेतली. लखनऊला परतल्यावर ते योगींना भेटले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी योगी सरकार आणि भाजप यांच्यात काही बदल केले जाणार आहे. विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यांसह लढवण्याचा भाजपचा मानस आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा