शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशमध्ये भाजपा 40 आमदारांचे पंख छाटणार?, उमेदवारांची आज होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 08:44 IST

राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणातल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली.

नवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणातल्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्लीतल्या भाजपाच्या कार्यालयात आगामी निवडणुकीसाठी जागांच्या वाटपासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात होणा-या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. त्यामुळे भाजपा आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणातल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि आमदारांच्या खराब कामगिरीसंदर्भात चर्चा झाली. कैलाश विजयवर्गीय विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. ते स्वतःच्या मुलासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास मध्य प्रदेशातील 40 विधानसभा आमदारांना घरी बसवलं जाणार आहे. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच भाजपा जवळपास अर्ध्या डझनांहून अधिक खासदारांना या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनीही 80 उमेदवारांची याची केंद्रीय नेतृत्वाला सोपवली आहे. परंतु राज्य आणि केंद्र सरकारमध्ये या उमेदवारांच्या नावावर अद्याप सहमती झालेली नाही. 

राज्य सरकार आणि स्थानिक आमदारांविषयी लोकांमध्ये असलेल्या रागाचा फटका बसू नये, यासाठी भाजपने राजस्थानात किमान 80 ते 100 नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरविल्याचे समजते. म्हणजेच विद्यमान 80 ते 100 आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या विधानसभेत 200 पैकी 160 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेसने 25 जागांवर विजय मिळवला होता आणि अन्य पक्ष व अपक्ष मिळून 15 जागांवर विजयी झाले होते. इतके स्पष्ट बहुमत पाच वर्षांपूर्वी मिळालेल्या भाजपला यंदाची निवडणूक खरोखरच अवघड वाटत आहे. मध्य प्रदेशातील 60 ते 70 विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याचेही भाजपने ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह