शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा लाख न दिल्यानं पंतप्रधान मोदी, शहांविरोधात फसवणुकीची तक्रार; खटला चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:15 IST

रांचीतल्या जिल्हा न्यायालयात सुनावणीला सुरुवात

रांची: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांनी फसवणूक केल्याचा आरोप करत एका व्यक्तीनं न्यायालयात धाव घेतली आहे. रांचीतल्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयातले वकील एच. के. सिंह यांनी मोदी आणि शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सत्तेत आल्यावर प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचं आश्वासन देऊन दोघांनी देशवासीयांची फसवणूक केल्याचा सिंह यांचा आरोप आहे. मोदी, शहांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४१५, ४२० अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कालपासून जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मोदी, शहांनी देशाची फसवणूक केल्याचा आरोप करताना वकील एच. के. सिंह यांनी अमित शहांच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरील (सीएए) विधानांचा दाखला दिला. '२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात देशवासीयांना सीएए लागू करण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळेच आम्ही निवडून आल्यावर सीएए लागू केल्याचं शहा सांगतात. शहा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकतात. मग जाहीरनाम्यातल्या १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाहीत?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ मार्चला होणार आहे. आश्वासनांची पूर्तता न करणं म्हणजे देशवासीयांची फसवणूक असल्याचं सिंह म्हणाले. 'मोदी, शहांसोबतच भाजपाच्या इतर नेत्यांनीदेखील देशवासीयांना अनेक आश्वासनं दिली. मात्र त्यांची पूर्तता झाली नाही. भाजपा सीएएचं आश्वासन पूर्ण करू शकते. मग १५ लाखांचं वचन का पूर्ण करू शकत नाही? हा भाजपाचा दुटप्पीपणा नाही का?,' असे प्रश्न सिंह यांनी विचारले. सिंह यांनी दाखल केलेली तक्रार म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं प्रत्युत्तर भाजपाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी दिलं. सहा वर्षांनंतर दाखल करण्यात आलेली तक्रार केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचं शाहदेव म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा