शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

PM मोदींच्या प्रयत्नांना यश; GE एरोस्पेसचा HAL सोबत करार, भारतात बनणार जेटचे इंजिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:35 IST

आता भारतात फायटर जेटचे इंजिन बनणार आहे. अमेरिकेच्या GE एअरोस्पेसे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केला आहे.

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, अमेरिकेतील जीई एरोस्पेस(GE Airospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या अंतर्गत जीई एरोस्पेस, एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवणार आहे. पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्राला गती मिळणार आहे.

GE एरोस्पेसने सांगितले की, या करारांतर्गत भारतात GE एरोस्पेसच्या F414 इंजिनचे उत्पादन होईल. सध्या GE एरोस्पेस यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सरकारसोबत काम करत आहे. हा करार भारतीय हवाई दलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट MK2 साठी करण्यात आला आहे. 

GE के अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेंस कल्प जूनियर म्हणाले की, हा भारत आणि HAL सोबतचा आमचा ऐतिहासिक करार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील जवळचा समन्वय वाढवण्यात जी भूमिका बजावली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमची F414 इंजिने अतिशय मजबूत आहेत आणि दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

GE भारतात कधीपासून कार्यरत आहे?जीई एरोस्पेस भारतात 4 दशकांहून अधिक काळापासून कार्यरत आहे. पण, आतापर्यंत GE एरोस्पेस भारतात एव्हियोनिक्स,  इंजीनिअरिंग, उत्पादन आणि स्थानिक सोर्सिंग क्षेत्रात काम करत होता. पण, आता F414 इंजिन बनवण्याचे काम केले जाणार आहे.

भारताच्या संरक्षण क्षेत्रात GE चे योगदान GE एरोस्पेसने F404 इंजिनसह हलके लढाऊ विमान (LCA) विकसित करण्यासाठी 1986 मध्ये भारतातील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि HAL सोबत काम करण्यास सुरुवात केली. F404 आणि F414 हे GE एरोस्पेसच्या LCA Mk1 आणि LCA Mk2 कार्यक्रमांच्या विकास आणि उत्पादन कार्यक्रमांचा भाग होते. GE ने आतापर्यंत एकूण 75 F404 इंजिने दिली आहेत. LCA Mk1A साठी 99 इंजिने मिळणार आहेत.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडन