शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 19:00 IST

PM Modi Advise To BJP Leaders: अलिकडेच मध्य प्रदेश आणि हरियाणातील भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे.

BJP Leaders Remarks On Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि.25) नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांना कडक शब्दात सल्ला दिला. त्यांनी नेत्यांना त्यांच्या भाषणात बोलण्यावर संयम ठेवण्यास आणि अनावश्यक आणि वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना केल्या. विशेषतः ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने करून भाजपची प्रतिमा मलिन करणाऱ्या नेत्यांना पंतप्रधान मोदींचा सल्ला होता. 

बैठकीत सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाचे कौतुक करणारा ठराव मंजूर करण्यात आला. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या प्रस्तावात 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे म्हटले आहे. या ठरावात मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करण्यात आले आणि म्हटले की, त्यांनी नेहमीच सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आणि 'ऑपरेशन सिंदूर' ने दहशतवाद्यांसह त्यांच्या प्रायोजकांना योग्य उत्तर दिले आहे. बैठकीत 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान मोदींचा रोख कुणाकडे?अलिकडेच मध्य प्रदेश आणि हरियाणातील भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी झाली. हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगरा, विजय शाह आणि मध्य प्रदेशातील जगदीश देवडा यांनी या मुद्द्यावर निषेधार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. विरोधी पक्षाने म्हटले की, पंतप्रधान आणि भाजप नेतृत्वाचे मौन हे या विधानांना मूक मान्यता म्हणून पाहिले पाहिजे. पहलगाम पीडितांना आणि सशस्त्र दलांना बदनाम करण्यासाठी भाजप नेते एकमेकांशी स्पर्धा करत असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?पहलगाममधील बळी आणि आपल्या शूर सैन्याला बदनाम करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांच्या लज्जास्पद विधानाने पुन्हा एकदा आरएसएस-भाजपची क्षुद्र मानसिकता उघडकीस आणली आहे. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी आपल्या शूर सैन्याचा अपमान केला, परंतु मोदींनी कोणतीही कारवाई केली नाही. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर अश्लील टिप्पणी केली, परंतु आजपर्यंत त्यांना काढून टाकले नाही. जेव्हा पहलगाममधील शहीद नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, तेव्हाही मोदीजी गप्प होते. मोदीजी, तुम्ही म्हणता की तुमच्या नसांमध्ये सिंदूर आहे... जर तसे असेल तर महिलांच्या आदरासाठी तुम्ही तुमच्या या वाईट बोलणाऱ्या नेत्यांना काढून टाकावे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा