शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:49 PM

VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी VivaTech (वीवाटेक)च्या कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडिओ काँफरन्सिंगच्या माध्यमाने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कोरोना महामारी तसेच यामुळे जगाला कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, हे व्यासपीठ फ्रान्सच्या तांत्रिक गोष्टी दर्शवते. भारत आणि फ्रान्स व्यापक विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल सहकार्य विकसित होणारे क्षेत्र आहेत आणि ही काळाची गरज आहे. 

कोव्हॅक्सीनमध्ये वापरलं गेलं गाईच्या वासराचं सीरम? काँग्रेसच्या प्रश्नावर भारत बायोटेकनं दिलं असं स्पष्टीकरण

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी जगाला प्रतिभा, बाजार, वित्त, इकोसिस्टम आणि ओपन मार्केटची संस्कृती, या पाच स्तंभांच्या आधारावर गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करतो. भारतात 775 मिलियन इंटरनेट युझर्स आहेत. हे अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहेत. जगात सर्वाधिक आणि सर्वात स्वस्त डेटा देणाऱ्या देशांत भारत पहिल्या स्थानावर आहे.  कोरोनावर भाष्य करताना मोदी म्हणाले, भारतात कोरोना महामारी आली, तेव्हा आमच्याकडे पुरेशी टेस्ट क्षमता, मास्क, पीपीई किट आणि अशा इतर काही उपकरणांची कमतरता होती. मात्र, आमच्या खासगी श्रेत्राने ही कमतरता दूर करण्यात अत्यंत  मोलाची भूमिका बजावली. तसेच, जर आम्ही इनोव्हेशन केले नसते, तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती. या युद्धात आपल्याला ढिलाईने काम करून चालणार नाही. म्हमजे, भविष्यात पुन्हा संकट आले, तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने तयार असू.

भाजपमध्ये जोरदार इनकमिंग; आणखी एक बडा नेता हाती कमळ घेऊन सुरू करणार नवी इनिंग

VivaTech हा युरोपातील सर्वात मोठ्या डिजिटल आणि  स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक आहे. हा कार्यक्रम 2016 पासून दरवर्षी पॅरिस येथे आयोजित केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम 16 ते 19 जून 2021 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्यांमध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज आणि युरोपातील विविध देशांचे मंत्री/खासदार सामील होते. या कार्यक्रमात टिम कुक, (सीईओ अॅप्पल) मार्क झुकरबर्ग (सीईओ फेसबुक) आणि ब्रॅड स्मिथ, (अध्यक्ष, मायक्रोसॉफ्ट) सारख्या इतर दिग्गजांचीही भागीदारी असेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतFranceफ्रान्सBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या