शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

PM Kisan Scheme : मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार गिफ्ट, उद्या खात्यात पाठवले जाणार 19000 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:03 IST

PM Kisan Scheme : 14 मे रोजी 11 वाजता ही ही रक्कम पाठवली जाणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी  दिली आहे.

ठळक मुद्देमोदी सरकार कडून (Modi Government)पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यावेळीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi scheme) आठवा हप्ता देणार आहेत. 14 मे रोजी 11 वाजता ही ही रक्कम पाठवली जाणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी  दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही रक्कम हस्तांतरित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (pm kisan nidhi scheme 8th installment pm modi will transfer to 9.5 crore farmers account check details)

यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट केले आहे. "पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मो 2020 रोजी सकाळी PM Kisan योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करतील", असे नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, या लाइव्ह इव्हेंटची लिंक देखील नरेंद्र सिंह तोमर यांनी या ट्वीटमध्ये शेअर केली आहे. pmevents.ncog.gov.in लाईव्ह कार्यक्रमासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता. हे पैसे डीबीटीच्या (Direct Benefit Transfer) माध्यमातून अर्थात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहे.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणे, खते खरेदी करण्याकरता निधी मिळावा म्हणून राबवली जात आहे. मोदी सरकार कडून (Modi Government)पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा आठवा हप्ता (PM Kisan 8th installment) शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची तारीख ठरली आहे. आधी आलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारांनी RFT (Request For Transfer) Sign केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही FTO (Fund Transfer Order) काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये RFT Signed by State For 8th Installment  असा स्टेटस दिसत आहे.  PMkisan.gov.in वर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तपासू शकणार आहात. 

कसे चेक कराल?- PMkisan.gov.in वर लॉगिन करा...- तिथे 'Farmers Corner' मिळणार आहे. -'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary List' हा ऑप्शन मिळणार आहे. - 'Beneficiary List' च्या बटनावर क्लिक करा...- या पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा. - यानंतर 'Get Report' वर क्लिक करा. यामध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे. - महत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असते. तसेच एकापेक्षा जास्त पानांची असते. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर