शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:12 IST

PM Kisan Samman Nidhi 2021 Latest News : 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेंतर्गत मिळणाऱ्या  10व्या हप्त्याची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. पीएम किसान सन्मान निधी 2021 योजनेचा (PM Kisan Samman Nidhi 2021) हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचा मेसेजही लाभार्थ्यांना पाठवण्यात आला आहे. 1 जानेवारीला पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता पीएम किसान योजनेअंतर्गत 10 वा हप्ता जारी करतील. या दिवशी पीएम मोदी शेतकरी उत्पादक संघटनांना इक्विटी अनुदानही जारी करतील, अशीही माहिती या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. शेतकरी pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून या कार्यक्रमात सामील होऊ शकतात.

दरम्यान, पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत केंद्र सरकारने 11.17 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. पहला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान करण्यात येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

आतापर्यंत शेतकऱ्यांना 9 हफ्ते मिळाले आहेतपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 9 हफ्ते दिले आहेत. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दहाव्या हप्त्यासोबतच नवव्या हप्त्याचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही दोन हफ्त्याची रक्कम मिळेल. त्यामुळे या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. 

योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेकपीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी / Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी