शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

पीएम-किसान निधीत घोटाळा; बनावट शेतकरी खात्यांची सरकार करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 6:37 AM

लाभार्थी हा खरोखर शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते.

हरीश गुप्ता नवी दिल्ली :पंतप्रधान किसान योजनेचा लाभ बनावट शेतकरी लाभार्थींनी घेतल्याचे व मोठ्या प्रमाणावर निधीला गळती लागल्याचे उघड झाल्यावर केंद्र सरकारने आता देशव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने या योजनेखाली एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ११.०७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दिले. यात महाराष्ट्रातील १.१० कोटी शेतकरी आहेत.

लाभार्थी हा खरोखर शेतकरीच आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते. तामिळनाडूत या योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला.

कृषी मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, ‘‘काही लबाड लोकांनी मोठ्या संख्येत अपात्र व्यक्तींची या योजनेखाली नाव नोंदणी करून घेण्यासाठी जिल्हा अधिकाºयांच्या लॉगइन आणि पासवर्डचा गैरवापर केला.’’

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तामिळनाडूत पीएम-किसान योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे मान्य केले. १५ सप्टेंबर, २०२० पर्यंत ५.९५ लाख लाभार्थींच्या खात्यांची तपासणी करण्यात आली त्यात ५.३८ लाख हे अपात्र होते, असे स्पष्टझाले. ९६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपवण्यात आली, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांसह ५२ जणांना अटक करण्यात येऊन मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झाले.एकूण शेतकरी : १४.६४ कोटीपीएम-किसानचे लाभार्थी : ११.०७ कोटीमहाराष्ट्रातील लाभार्थी : १.१० कोटीदिलेला निधी : १.१० लाख कोटीबनावट लाभार्थी उघडकीस : ५.३८ लाख तामिळनाडूत.

लाभार्थींची ओळख पटवण्याची जबाबदारी ही राज्यांची असल्यामुळे या योजनेत गमवावा लागलेला पैसा परत मिळवून केंद्राला तो परत करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.

या योजनेतील किमान ५-६ टक्के लाभार्थींची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकार पाऊल उचलणार असल्याचे सरकारमधील उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

61 कोटी रुपये परत मिळवण्यात आले, असे अधिकारी म्हणाला. इतर राज्यांतही असेच घोटाळे आहेत का, हे शोधण्यासाठी केंद्राने देशव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाprime ministerपंतप्रधानGovernmentसरकारFarmerशेतकरी