ममतांना ठार मारण्याचाच कट होता, तृणमूलचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:43 AM2021-03-12T05:43:18+5:302021-03-12T05:43:43+5:30

तृणमूलचा आरोप; भाजप, काँग्रेसला हल्ल्याविषयीच शंका

The plot was to kill Mamata, Trinamool alleges | ममतांना ठार मारण्याचाच कट होता, तृणमूलचा आरोप

ममतांना ठार मारण्याचाच कट होता, तृणमूलचा आरोप

Next

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वीकारली पाहिजे. त्यांना ठार मारण्याचा कट होता, असा आरोप गुरुवारी तृणमूल काँग्रेसने गुरूवारी केला. निवडणूक काळात राज्यातील कायदा-व्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. दुसºया राज्यांतून समाजकंटक नंदीग्रामला आणून हिंसाचार घडविण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे असेही तृणमूलच्या नेत्यांनी बोलून दाखविले.
या हल्ल्याप्रकरणी तृणमूल व भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांची भेट घेतली. या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली.   मात्र ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करतानाच प्रदेश भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, मते मिळवण्यासाठी ममतांनी हे नाटक केले नाही ना, हे तपासायला हवे. त्यांची अशी नाटके जनतेने याआधी पाहिली आहेत. भाजपचे दोन नेते त्यांच्या या विधानानंतर  ममता बॅनर्जी यांची विचारपूस करायला रुग्णालयातही गेले. राज्यपाल जगदीप धनखड यांनीही काल रुग्णालयात जाऊ न प्रकृतीची चौकशी केली.

हल्ल्याच्या ठिकाणची पाहणी 
बॅनर्जी यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणी नंदीग्राम जिल्हाधिकारी विभू गोयल, पोलीस अधीक्षक प्रवीण प्रकाश व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी भेट दिली. या घटनेच्या साक्षीदारांकडून या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आणि हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले.

पटनायक यांना चिंता
या हल्ल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: The plot was to kill Mamata, Trinamool alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.