पान 5 दुर्गाभाट-फोंडा येथे आगीत प्लॅटची हानी

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

फोंडा : दुर्गाभाट-फोंडा येथे शुक्रवार, दि. 21 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाल्याची माहिती फ्लॅटमालकाने दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी वेळेवर येऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

Plot loss in fire in Durgabhat-Fonda | पान 5 दुर्गाभाट-फोंडा येथे आगीत प्लॅटची हानी

पान 5 दुर्गाभाट-फोंडा येथे आगीत प्लॅटची हानी

ंडा : दुर्गाभाट-फोंडा येथे शुक्रवार, दि. 21 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका इमारतीतील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाल्याची माहिती फ्लॅटमालकाने दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी वेळेवर येऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
या फ्लॅटमध्ये राहणारे प्रवीण चिपकर, पत्नी व त्यांचा मुलगा झोपले असता मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्रवीण चिपकर यांना काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यांनी उठून पाहणी केली असता फ्लॅटमध्ये सगळीकडे त्यांना धूर दिसला. लगेच त्यांनी पत्नी व मुलाला बाहेर काढून अग्निशामक दलाला पाचारण केले. शेजार्‍यांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन प्रथम स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडर सुखरूप बाहेर काढला. मात्र, फ्लॅटमधील टीव्ही, फॅन व इतर किमती वस्तू ते वाचवू शकले नाहीत. विजेचा दाब वाढल्याने आग लागल्याचा अंदाज चिपकर यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)

ढँ3 : 2208-ढडठ-03
कॅप्शन: दुर्गाभाट-फोंडा येथे फ्लॅटला आग लागल्याने जळालेले सामान.
छाया- साईशा च्यारी

Web Title: Plot loss in fire in Durgabhat-Fonda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.