शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 09:57 IST

मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला.

सुरेश एस. डुग्गरजम्मू : श्रीनगरविमानतळाजवळ मोठा बाँबस्फोट घडवण्याचा कट सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. अतिरेक्यांनी विमानतळाजवळ गोगो गल्लीत स्टीलच्या डब्यात आयईडी ठेवले होते.  सुरक्षादलांनी या आयईडीचा शोध लावून बाँबही निष्क्रिय केले.मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. गोगो गल्लीजवळ अंदाजे ६ किलो वजनाच्या स्टील कंटेनरमध्ये आयईडी ठेवल्याचे समजताच सुरक्षादलांनी त्या भागाला सील केले. या स्फोटकांमुळे मोठी हानी झाली असती, असे पोलीस अधिकारी म्हणाले.

उरीमध्ये अतिरेकी घुसले : ३० तासांपासून ऑपरेशन- नवी दिल्ली : काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीवरुन अतिरेक्यांच्या मोठ्या टोळीने घुसखोरी केल्यानंतर सैन्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ३० तासांपासून हे ऑपरेशन सुरु आहे. - सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, एलओसीवर घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. उरी परिसरातील इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा दलाला बोलाविण्यात आले आहे.- अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्च ऑपरेशन १८ आणि १९ सप्टेंबरच्या रात्री सुरु करण्यात आले. नियंत्रण रेषेवर झालेल्या एका चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे.

सीमांवर नवी आव्हाने -राहुल गांधीचीन सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करीत असल्याच्या प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा आधार घेऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भारत सीमांवर युद्धाच्या नव्या प्रकारांना तोंड देत आहे, असे ट्विटवर म्हटले.चीनने लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किमान १० नवे हवाई तळ बांधले असल्याची आणि भारतीय सीमांजवळ पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्याची वृत्ते नुकतीच प्रसिद्ध झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संवेदनशील भागात दोन्ही देशांनी सुमारे ५० ते ६० हजार सैन्य तुकड्या सध्या तैनात केलेल्या आहेत. 

टॅग्स :Srinagarश्रीनगरAirportविमानतळBombsस्फोटकेSoldierसैनिक