शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

तामिळनाडूत निवडणुकांच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात, सोलर कूकर, घर मोफत अन् शैक्षणिक कर्जही माफ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 4:39 AM

 अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा  केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे. 

चेन्नई : तामिळनाडूतील जनतेच्या घरात गेल्या १५ वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमुळे काही ना काही वस्तू मोफत मिळाल्या आहे. त्या कमी आहेत की काय, म्हणून यंदा पुन्हा अण्णा द्रमुक व द्रमुक या दोन पक्षांनी अशा आणखी आश्वासनांची सध्या खैरात चालवली आहे. (Pledges On the occasion of elections in Tamil Nadu, solar cookers, free housing and education loans waived) अण्णा द्रमुकने वॉशिंग मशिन, सोलर कुकर मोफत देण्याबरोबरच प्रत्येकाला घर बांधून देण्याची घोषणा  केली आहे. घरातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळेल आणि शैक्षणिक कर्जाची रक्कम माफ केली जाईल, असे पक्षाने जाहीरनाम्यात म्हटले आहे.  त्यामुळे द्रमुकनेही शैक्षणिकच नव्हे, तर अन्य काही कर्जेही माफ करण्याची घोषणा केली आहे. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण आणि कोविडचा रुग्ण आढळला, त्या कुटुंबाला ४ हजार रुपये मदत देण्याचे घोषित केले आहे. हे सारे करण्यासाठी निधी कोठून आणणार, याचे उत्तर ते देत नाहीत. तामिळनाडूला सर्वाधिक महसूल दारूतून मिळतो. तरीही दारूबंदी करू, अशी घोषणा दोन्ही पक्ष करीत आहेत. 

 या आधीच्या निवडणुकांत रंगीत टीव्ही संच, लॅपटॉप, मोबाइल, मंगळसूत्र, दुभती गाय, मिक्सर, ग्राइंडर अशी आश्वासने या दोन्ही पक्षांनी जनतेला दिली. मुख्य म्हणजे ती पूर्ण केली. त्यामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला. पण वस्तू मोफत मिळत असल्याने लोक खूश झाले. यंदाही निवडणुकांनंतर  अनेकांच्या घरात काही ना काही वस्तू आपोआप येणार आहेत. 

ग्राइंडर, मिक्सरवर प्रेम- तामिळनाडूतील जनतेला अन्य वस्तूंपेक्षा मिक्सर व ग्राइंडर या वस्तू हव्या असतात. इडली, डोसा यांचे पीठ ग्राइंडरमध्ये तयार करता येते.

- चटण्या मिक्सरमध्ये करता येतात. अन्यथा त्यासाठी रगडा व पाटा वरवंटा लागतो.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूPoliticsराजकारणTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021