शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'साहेब, होळीला सुट्टी द्या नाहीतर बायको दुसऱ्यासोबत पळून जाईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 15:31 IST

या अर्जद्वारे या पोलिसाने आपली वेगळीच कहानी वरिष्ठांकडे मांडली, सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भागलपूर - पोलीस विभागात काम करताना किंवा सैन्य दलात काम करत असलेल्या जवानांचा सुट्टीसाठी नेहमीच हिरमोड होतो. इतरांच्या सुट्टीदिवशी त्यांची ऑन ड्युटी असते, हेच आता सर्वांनी मान्यच केलं आहे. मात्र, कुठल्याच सणाला सुट्टी मिळत नसल्याने, एका पोलिसाने पत्र लिहून आपली व्यथा वरिष्ठांकडे मांडली आहे. होळीमुळे पोलीस विभागाकडून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. 

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सीटीएस नाथनगर येथील एका प्रशिक्षक पोलीस शिपायाने सीटीएस प्रमुखांकडे अर्ज केला आहे. या अर्जद्वारे या पोलिसाने आपली वेगळीच कहानी वरिष्ठांकडे मांडली, सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या निवेदन अर्जात लिहिले आहे की, 5 मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या पत्नीचा फोन आला होता. ''यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी यायचंय, नाही आलात तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल,'' पत्नीचे हे वाक्य ऐकून मी खूप तणावात आलो आहे, असे संबंधित पोलिस शिपायाने आपल्या अर्जात म्हटल्याचे वृत्त ईटीव्ही भारतच्या हिंदी वेबसाईटने प्रकाशित केले आहे.

विशेष म्हणजे पुढे विनंतीही केली आहे. मला होळीसाठी 5 दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलीस शिपायाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा निवेदन अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहारHoliहोळीbhagalpur-pcभागलपूर