'प्रो कबड्डी लीग'मधील खेळाडूच्या पत्नीने केली आत्महत्या

By Admin | Updated: October 19, 2016 09:53 IST2016-10-19T09:28:14+5:302016-10-19T09:53:10+5:30

राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित कुमारच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Players' suicide in 'Pro Kabaddi League' commits suicide | 'प्रो कबड्डी लीग'मधील खेळाडूच्या पत्नीने केली आत्महत्या

'प्रो कबड्डी लीग'मधील खेळाडूच्या पत्नीने केली आत्महत्या

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - राष्ट्रीय कबड्डीपटू रोहित कुमारच्या पत्नीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ललिता दाबास (२८) असे रोहितच्या पत्नीचे नाव आहे. पश्चिम दिल्लीतील आपल्या आई-वडिलांच्या घरी असताना तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. 
 
सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ललिताच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली असून, या चिठ्ठीत तिने रोहित आणि त्याचे आई-वडिल हुंडयासाठी आपला छळ करत होते असा आरोप केला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात ललिता आणि रोहितचे लग्न झाले होते. मागच्या काही आठवडयांपासून ती आपल्या आई-वडीलांच्या घरी रहात होती. 
 
नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये रोहितने बंगळुरु बुल्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. रोहितला आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीत हिस्सा हवा होता असा आरोप ललिताने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये तिने तिचा मोबाईल फोन अनलॉक करण्याचा कोडही लिहीला होता. यामध्ये तिने दोन व्हॉईस मेसेजस रेकॉर्ड करुन ठेवले होते. 
 
एक मेसेज जवळपास अडीच तासांचा आहे. रोहित कुमार विरोधात हुंडा आणि छळवणुकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित कुमार २००९ पासून नौदलाच्या सेवेत आहे. स्पोटर्स कोटयातंर्गत त्याला ही नोकरी मिळाली आहे. 
 

Web Title: Players' suicide in 'Pro Kabaddi League' commits suicide