उद्योजकांच्या सहभागानेच योजना यशस्वी : चक्रवर्ती
By Admin | Updated: July 8, 2015 15:05 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-08T15:05:11+5:30
सातपूर : शासनाकडून उद्योजकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना सफल होण्यासाठी निर्यातदार उद्योजकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. अन्यथा योजना कागदावरच राहतील, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ फॉरेन ट्रेडचे (नवी दिल्ली) सहायक प्राध्यापक डॉ. देवाशिष चक्रवर्ती यांनी केले.

उद्योजकांच्या सहभागानेच योजना यशस्वी : चक्रवर्ती
सातपूर : शासनाकडून उद्योजकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजना सफल होण्यासाठी निर्यातदार उद्योजकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. अन्यथा योजना कागदावरच राहतील, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ फॉरेन ट्रेडचे (नवी दिल्ली) सहायक प्राध्यापक डॉ. देवाशिष चक्रवर्ती यांनी केले.
निमा, आयमा, जिल्हा उद्योग केंद्र आणि भारतीय विदेश व्यापार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदार आणि निर्यातक्षम उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. चक्रवर्ती यांनी निर्यातदार उद्योजकांसाठीच्या योजना, संस्थेचे कार्य याविषयी माहिती विशद करून उद्योजकांशी संवाद साधला. सर्वेक्षणानंतरचा अहवाल राज्य आणि केंद्र शासनाला दिला जातो व त्याद्वारे निर्यात धोरण विकसित केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक प्रवीण देशमुख, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, निमाचे अध्यक्ष रवि वर्मा, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, हर्षद ब्रााणकर, निरज बदलानी, ज्ञानेश्वर गोपाळे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक पी. पी. देशमुख यांनी केले. स्वागत साहेबराव पाटील यांनी केले. निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हर्षद ब्रााणकर यांनी केले. यावेळी संजीव नारंग, मधुकर ब्रााणकर आदिंसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.