Independence Day : स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवणार आहात?... पण, 'हे' नियम ठाऊक आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:16 PM2019-08-14T15:16:32+5:302019-08-14T16:33:28+5:30

समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनामनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो.

Planning to hoist Tricolour on Independence Day? Here are rules you need to follow while hoisting Indian Flag | Independence Day : स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवणार आहात?... पण, 'हे' नियम ठाऊक आहेत का?

Independence Day : स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवणार आहात?... पण, 'हे' नियम ठाऊक आहेत का?

googlenewsNext
ठळक मुद्देब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो.

नवी दिल्ली -  73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्ये सांगणारा तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बळकट लोकशाहीचे विचार रूजविणारा तिरंगा स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाच्या हातात अभिमानाने मिरवला जातो. राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ, हा झेंडा कसा तयार झाला?, झेंडा फडकवताना कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया....

राष्ट्रध्वजातील रंगांचा अर्थ

- भगवा किंवा केशरी हे त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे. 

- पांढरा प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.

 - हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे. 

- झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे. 

Independence Day with a one-kilometer long national flag in Akola | स्वातंत्र्य दिनाला एक किलोमीटर लांबीच्या तिरंग्यासह ध्वज यात्रा

राष्ट्रध्वजासंबंधी नियम

भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.

–    भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे.

–    राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडापासून बनवला जावा असा सरकारी नियम आहे

–    ध्वज फडकवताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा

–   ध्वज फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

–    शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा.

–    केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.

–    राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.

देशाला पहिला राष्ट्रध्वज 1906 मध्ये तयार करण्यात आला होता. कोलाकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. 

नंतर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज 1917 मध्ये समोर आला. यात 5 लाल आणि 4 हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ. एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता. 

भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास 1921 मध्ये तेव्हा सुरू झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. त्यानंतर ध्वजामध्ये काही बदल करण्यात आले. हा ध्वज आधी अखिल भारतीय काँग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज 1931 मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. 22 जुलै 1947 रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला. 

 

Web Title: Planning to hoist Tricolour on Independence Day? Here are rules you need to follow while hoisting Indian Flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.