शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:05 IST

भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 

ठळक मुद्दे मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. तेव्हापासून ते सातत्याने काम करत आहे.मंगळयानाने आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त फोटो पाठवले आहेत.

नवी दिल्ली - इस्रोचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्याने चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश होण्याची संधी भारतासमोर होती. मात्र या यशाने इस्रोला थोडक्यात हुलकावणी दिली. यानंतरही इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहीम 98 टक्के यशस्वी झाली आहे. चांद्रयान-2 मोहीमेने 98 टक्के यश मिळविल्याचे सांगतानाच गगनयान हे पुढचे ध्येय आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी याआधी दिली आहे. भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 

मार्स ऑर्बिटर मिशन म्हणजेच मंगळयान हे केवळ 6 महिन्यांसाठी पाठवण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ते उत्तम काम करत आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताने हे मंगळयान पाठवलं होतं. 11 महिन्यांनी हे यान मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. फक्त 6 महिन्यांसाठी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात आलं होतं. मात्र मॉमने कधीच निराश केलं नाही. मार्स ऑर्बिटर मिशन सुरू असून इस्रोकडे मंगळाची माहिती पाठवत आहे.

24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहचलं होतं. तेव्हापासून ते सातत्याने काम करत आहे. आता त्याला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मंगळयानाने आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त फोटो पाठवले आहेत. तसेच पाच वर्षात मंगळयानाकडून इस्रोच्या डेटा सेंटरला 5 टीबीपेक्षा जास्त डेटा मिळाला आहे. शास्त्रज्ञ मंगळाच्या अभ्यासासाठी याचा वापर करत आहेत. जगातील सर्वात कमी खर्चात हे मोहीम आखण्यात आली होती. यासाठी 450 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

मंगळयान मंगळापासून किमान 421.7 किलोमीटर ते कमाल 76,993 किलोमीटरवरून फेरी मारत आहे. मंगळ ग्रहावर असलेल्या ओलिंपिस मॉन्स नावाच्या ज्वालामुखीचा फोटो मंगळयानाने घेतला होता. हा ज्वालामुखी आपल्या सौरमंडळात असलेल्या कोणत्याही पर्वतापेक्षा मोठा आहे. तसेच मॉमने पाठवलेल्या फोटोंवरून मंगळावर बर्फच बर्फ असल्याचे दिसते. सातत्याने बर्फवृष्टी कमी जास्त होत असते. चंद्राचा जास्तीजास्त 9 लाख 52 हजार 700 किमी ते किमान 6 लाख 33 हजार 825 किमी भाग बर्फाच्छादित असतो. मंगळयानाने मंगळावरील वेलेस मेरिनेरिसचे फोटो देखील घेतले आहेत. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) गगनयान प्रकल्पासाठी डिसेंबर 2020 मध्ये पहिली फ्लाईट सोडणार आहे. यानंतर जुलै 2021 मध्ये दुसरे मानवरहित फ्लाईट अंतराळात पाठविणार असल्याची घोषणा इस्रोचे प्रमुख सिवन यांनी सांगितले आहे. तसेच डिसेंबर 2021 मध्ये तिसरी फ्लाईट पाठविणार असून यातून पहिल्यांदाच भारतीय अंतराळवारी करणार आहेत. गगनयान भारतासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही मोहीम देशाची विज्ञान आणि प्रौद्योगिक क्षमतेला वाढविणार आहे. सिवन यांनी चांद्रयान-2 ची माहिती देताना इस्रोचे पुढील उद्दीष्ट गगनयान असल्याचे स्पष्ट केले होते. 

 

टॅग्स :isroइस्रोMarsमंगळ ग्रहEarthपृथ्वीChandrayaan 2चांद्रयान-2K. Sivanके. सिवन