शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

कर्नाटकी नाट्यामागं भाजपा? काँग्रेस आमदारांचा भाजपा खासदाराच्या विमानातून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 09:59 IST

भाजपा कर्नाटक सरकार अस्थिर करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: अस्तित्वापासून अस्थिर असलेलं कर्नाटक सरकार पुन्हा एकदा संकटात सापडलं आहे. काँग्रेस, जेडीएसच्या 10 आमदारांनी राजीनामा देऊन मुंबई गाठली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्याशी संबंधित कंपनीच्या विमानानं हे आमदार मुंबईत दाखल झाले. काँग्रेस, जेडीएसच्या 10 आमदारांनी शनिवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच हे आमदार बंगळुरुहून मुंबईला रवाना झाले. ज्युपिटर कॅपिटेल लिमिटेड कंपनीच्या विमानानं त्यांनी मुंबई गाठली. भाजपा खासदार चंद्रशेखर या कंपनीचे संस्थापक आहेत. सध्या या कंपनीचं चेअरमनपददेखील त्यांच्याकडेच आहे. काँग्रेस, जेडीएसचे आमदार ज्युपिटर कॅपिटलच्या विमानानं मुंबईला गेल्याच्या माहितीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. आम्ही व्यवसाय करतो. त्यामुळे ज्याला सेवा हवी असते, त्याला सेवा दिली जाते, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. मात्र आमदारांसाठी कोणी विमान बूक केलं याची माहिती देण्यास कंपनीनं नकार दिला. भाजपाकडून कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या, माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी. के. शिवकुमार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र भाजपानं हे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांच्या राजीनाम्यामागे भाजपाचा हात नसून तो सत्ताधारी पक्षांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं भाजपानं स्पष्ट केलं आहे. राज्यपालांनी सूचना केल्यास बहुमत सिद्ध करू, असा विश्वास विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं व्यक्त केला आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस