योजना आणल्या मात्र बारगळल्या -वाय.जी.महाजन
By Admin | Updated: March 13, 2016 23:55 IST2016-03-13T23:55:10+5:302016-03-13T23:55:10+5:30
नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्यांच्या सहकार्याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.

योजना आणल्या मात्र बारगळल्या -वाय.जी.महाजन
न िराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकार्यांच्या सहकार्याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे मत माजी खासदार वाय.जी.महाजन यांनी सांगितले.वाय.जी.महाजन पुढे म्हणाले की, गावाच्या वाढती लोकसंख्येमुळे पाणीटंचाईवर अगोदरच नियोजन करणे आवश्यक होेते मात्र आतापर्यत ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारींनी मुख्य जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष करीत योग्य त्यावेळी बळकटीकरण न केल्याने पाणीटंचाई भासत आहे. पर्यायी योजना म्हणू एमआयडीसींच्या पाण्यावरच अवलंबून राहत आले. त्यामुळे त्याच्या थकबाकीचा डोंगर वाढला. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालिन पदाधिकर्यांची साथ मिळाली नाही मुर्दापूर धरणाजवळील विहिरीचा व्यास, खोल मोठ्या प्रमाणावर न केल्याने त्याचे बळकटीकरण झाले नाही. सुमारे अडीच कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही त्यामुळेच बारगळली. ग्रामपंचायतीच्या निष्क्रीयपणामुळे गावात कृत्रीम पाणीटंचाई भासत असल्याचे वाय.जी. महाजन यांनी सांगितले. बेळी येथे वाघूर नदीपात्राजवळील पाणी योजना केंद्राजवळ स्वतंत्र वीजपुरवठा कनेक्शन, ट्रान्सफार्मर आतापर्यंत कार्यान्वित झाला नाही. त्यासाठी आता ग्रामपंचायतीने पाऊल उचलले आहे.