शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'हे' सात प्रकल्प बदलणार रेल्वेचा चेहरामोहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:53 IST

येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

नवी दिल्ली- नव्या रेल्वेमार्गांबरोबररेल्वेच्या आधुनिकीकरणावर आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जात आहे. येत्या काही वर्षांमध्ये रेल्वेमध्ये पूर्ण बदल व्हावा यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी काही विशेष मुद्द्यांवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

1) वेळापत्रकानुसार रेल्वे धावणे याला प्राधान्य असेल असे पीयूष गोयल यांनी सांगितले. नियोजित वेळेवर रेल्वेने प्रवास करावा यासाठी नियोजन केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या येण्याजाण्याच्या दैनंदिन वेळेची नोंद स्टेशनमास्तरच्या ऐवजी आता डेटा लॉगर्सकडून होत आहे. त्यामुळे वेळेवर रेल्वे धावण्याच्या प्रमाणात 1 एप्रिल 2018 पासून 73 ते 74 टक्के सुधारणा झाली आहे.2) प्रत्येक रेल्वेमध्ये जीपीस बसवण्याचा विचारही रेल्वेने केला आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे सध्या नक्की कोठे आहे हे मोबाइलवरही तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे ट्रेनचा रिअलटाइम डेटा उपलब्ध होईल.3) रेल्वेचे पूर्ण विद्युतीकरण केल्यास 2 अब्ज डॉलरची बचत होईल असे भारतीय रेल्वे खात्याचे मत आहे. गोयल यांच्या मते, एका डिझेल इंजिनचे ओवरहॉलिंग करण्याचा खर्च आणि त्याचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करण्याचा खर्च समानच आहे. त्यामुऴे कोणताही वेगळा निधी न वापरता सर्व इंजिन्सचे इलेक्ट्रीकमध्ये रुपांतर करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे यामुळे प्रदुषणात लक्षणीय घट होईल असाही विश्वास त्यांना वाटतो.4) रेल्वेचे वेळापत्रक सुधारावे यासाठी स्मार्ट टाइमटेबल तयार करण्याचा विचार करण्यात आलेला आहे.

5) रेल्वेमध्ये एकूणच सुधारणा व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. यादृष्टीने रेल्वेने एकेक टप्प्यावर काम सुरु केले आहे. नुकतेच रेल्वेमध्ये स्मार्ट कोचचा वापर सुरु झाला आहे. या स्मार्ट कोचमधील सेन्सरमुळे कोचची तपासणी व त्यातील स्वच्छता करणे सोपे जाणार आहे. 6) अधिक नवे सिग्नल वापरल्यानंतर रेल्वेचा वेग वाढवण्यास मदत होईल त्याचप्रमाणे 1 लाख 50 हजार पुलांचे ऑडिट करुन त्यांची दुरुस्ती केली जाईल.

7) पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये भारतामध्ये 6 हजार रेल्वे स्थानकांवर वायफाय सेव देण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम प्रदेशातील स्थानकांना त्याचा जास्त लाभ होईल.

 

टॅग्स :railwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयल