सरपंचपदी पिंगळे

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:15+5:302015-08-27T23:45:15+5:30

टाकळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील वारणवाडीच्या सरपंचपदी गंगुबाई पिंगळे यांची तर उपसरपंचपदी अंकुश काशिद यांची निवड करण्यात आली. सरपंचपद मागासप्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी पिंगळे व तेजस्विनी काशिद यांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये पिंगळे यांना ९ पैकी ७ मते मिळाली. तर उपसरपंचपदासाठी काशिद यांचा एकमेव अर्ज आला होता.

Pingle of sarpanch | सरपंचपदी पिंगळे

सरपंचपदी पिंगळे

कळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील वारणवाडीच्या सरपंचपदी गंगुबाई पिंगळे यांची तर उपसरपंचपदी अंकुश काशिद यांची निवड करण्यात आली. सरपंचपद मागासप्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी पिंगळे व तेजस्विनी काशिद यांचे अर्ज दाखल झाले होते. यामध्ये पिंगळे यांना ९ पैकी ७ मते मिळाली. तर उपसरपंचपदासाठी काशिद यांचा एकमेव अर्ज आला होता.
सविता म्हस्के सरपंच
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील कांबीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सविता म्हस्के यांची तर उपसरपंचपदी योगेश कुर्‍हे यांची बिनविरोध निवड झाली. आंतरवली खुर्दच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या गंगूताई वाघचौरे तर उपसरपंचपदी शोभा बळीद यांची, शेकटे बुद्रुकच्या सरपंचपदी गजराबाई बोरुडे यांची तर उपसरपंचपदी गोदावरी गरड यांची निवड करण्यात आली.
सरपंच निवड
मिरी : मिरी येथील ता. पाथर्डी सरपंचपदाची २८ ऑगस्ट रोजी निवड होणार आहे. सरपंचपद खुले असल्याने या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
हरिनाम सप्ताह
मिरी : मोहोज खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २ सप्टेंबर रोजी हभप उध्दव महाराज मंडलीक यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल.
जवळेत पाणी टंचाई
जवळा : पावसाने पाठ फिरविल्याने जवळा ता. जामखेड भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून खरीप पेरण्या वाया गेल्या आहेत. चारा प्रश्नही गंभीर बनला आहे. पावसाअभावी ओढे, नाले, छोटी धरणे कोरडी आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेला परिसर उजाड बनला आहे. पाण्यासाठी भटकंतीची वेळ नागरिकांवर आली आहे.
कोंडीबा दहिफळे
चापडगाव : शेवगाव तालुक्यातील ठाकूरपिंपळगाव येथील कोंडीबा बाबुराव दहिफळे (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ठाकूरपिंपळगाव सेवा संस्थेचे संचालक सूर्यभान दहिफळे यांचे ते वडील होते.

Web Title: Pingle of sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.