पिंपळगावी स्वरक्षण कार्यशाळा उत्साहात
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:16+5:302015-03-06T23:07:16+5:30
पिंपळगाव बसवंत : सध्याच्या असुरक्षित जगात ताठ मानेने जगायला पाहिजे. एकीत मोठी ताकद असते. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, असे प्रतिपादन लखमापूरला आदर्श करणार्या सरपंच ज्योतीताई देशमुख यांनी केले.

पिंपळगावी स्वरक्षण कार्यशाळा उत्साहात
प ंपळगाव बसवंत : सध्याच्या असुरक्षित जगात ताठ मानेने जगायला पाहिजे. एकीत मोठी ताकद असते. विजय हा नेहमी सत्याचाच होतो, असे प्रतिपादन लखमापूरला आदर्श करणार्या सरपंच ज्योतीताई देशमुख यांनी केले.पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थिनी स्वसंरक्षण कार्यशाळा झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मीनल जाधव, ॲड. राजेंद्र थिटे, पत्रकार वैशाली सोनार, उपप्राचार्य प्रा. एस. वाय. माळोदे, प्रा. ज्ञानोबा ढगे, डॉ. शंकर बोर्हाडे, प्रा. अभिजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते. श्रीमती देशमुख म्हणाल्या की, दारूबंदीसाठी मला दिल्लीपर्यंत मोठा लढा उभारावा लागला. त्यातूनच स्वसंरक्षण करायला शिकले. लहानपणीच पालकांचे छत्र हरपले. लखमापूर गावातील दारूगुत्त्यांनी संसार उघड्यावर आणले होते. पोलीस बंदोबस्तात ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडून दारूअड्डे उद्ध्वस्त करायला लावले. मात्र वेशीवरील सरकारमान्य दारू दुकान सुरूच होते. मंत्र्यापासून अधिकार्यांपर्यंत सर्वांनी घोर निराशा केली. पुन्हा महिलांची एकजूट केली. लढ्यासाठी मंगळसूत्र मोडले आणि दुकान बंद करायला लावलेच. महिलांची नावे मतदार यादीत नोंदवण्यासाठी संघर्ष केला. सरपंचपदाची निवडणूक लढवू नये म्हणून मला आमिषे, धमक्या आल्या. खोटे गुन्हे दाखल झाले. तरीही ग्रामस्थांच्या एकीच्या बळावर विजय मिळवला. गावात आता सोळा हजार झाडे लावली असून, भ्रष्टाचारावर वचक बसवला आहे. इंटरनेट, क्रीडांगण, स्त्रीभ्रूण हत्त्येला प्रतिबंध, स्वयंरोजगार आदि उपक्रम राबवत आहे. अण्णा हजारेंनी गावाला भेट देऊन शाबासकीची थाप दिली आहे. (वार्ताहर)फोटो ओळीपिंपळगाव बसवंत महाविद्यालयात विद्यार्थिनी स्वसंरक्षण कार्यशाळेत बोलताना डॉ. मीनल जाधव. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा. एस. वाय. माळोदे, प्रा. चित्रलेखा जोंधळे, प्रा. ज्ञानोबा ढगे, डॉ. शंकर बोर्हाडे आदि.