पिंपळगाव बसवंतला दिंड्यांचा मुक्काम
By Admin | Updated: January 13, 2015 23:57 IST2015-01-13T23:46:38+5:302015-01-13T23:57:54+5:30
पिंपळगाव बसवंत : संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाणार्या अनेक दिंड्या पिंपळगावी मुक्कामी आल्याने पिंपळगाव बसवंत शहरातील वातावरण दिंडीमय झाले आहे.

पिंपळगाव बसवंतला दिंड्यांचा मुक्काम
पिंपळगाव बसवंत : संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर येथे जाणार्या अनेक दिंड्या पिंपळगावी मुक्कामी आल्याने पिंपळगाव बसवंत शहरातील वातावरण दिंडीमय झाले आहे.
त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी जाणार्या शेकडो दिंड्या पिंपळगावी विविध ठिकाणी मुक्कामी राहतात. याठिकाणी भजन, कीर्तन होत असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)
----