शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 17:16 IST

Rajasthan News: काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ दिवस उलटत नाहीत तोच पुत्रवियोगाने दुखी झालेल्या आईनेही आज जयपूर येथे प्राण सोडले.

काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ दिवस उलटत नाहीत तोच पुत्रवियोगाने दुखी झालेल्या आईनेही आज जयपूर येथे प्राण सोडले.

राजवीर सिंह यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. त्यांना आपल्या मुलाचा वियोग सहन होत नव्हता. दरम्यान, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना जबर धक्का बसला होता. तसेच त्यांची प्रकृती गंभीर होती, असे डॉक्टरांनी सांगितले.

राजवीर सिंह यांना अखेरचा निरोप देतानाच त्यांच्या आईची प्रकृती खालावली होती. मुलाच्या मृतदेहाकडे पाहून त्या सारख्या बेशुद्ध पडत होत्या. दरम्यान, आज त्यांचं निधन झाल्याने आधीच राजवीर सिंह यांच्या अकाली जाण्याने शोकसागरात बुडालेल्या कुटुंबावर आणखी एक दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राजवीर सिंह हे लष्करामध्ये सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांनी आर्यन एव्हीएशन कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. राजवीर सिंह यांची पत्नीही भारतीय लष्करात सेवेत असून, चार महिन्यांपूर्वीच त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला होता.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवानKedarnathकेदारनाथAccidentअपघात