हेलिकॉप्टर अपघाताच्या एक महिन्यानंतर वैमानिकाचा मृतदेह सापडला; तीनजण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 15:55 IST2024-10-11T15:52:29+5:302024-10-11T15:55:10+5:30
काही दिवसापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दलाच्या विमानाला अपघात झाला होता. आता एका महिन्याहून अधिक काळ बेपत्ता असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पायलटचा मृतदेह सापडला आहे.

हेलिकॉप्टर अपघाताच्या एक महिन्यानंतर वैमानिकाचा मृतदेह सापडला; तीनजण बेपत्ता
काही दिवसापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात भारतीय तटरक्षक दलाच्या विमानाला अपघात झाला होता.आता एका महिन्याहून दिवसानंतर या अपघातातील पायलटचा मृतदेह सापडला आहे. हा अपघात सप्टेंबर महिन्यात झाला होता.
ALH MK-III हे हेलिकॉप्टर २ सप्टेंबर रोजी पोरबंदरजवळ अरबी समुद्रात कोसळल्यानंतर तीन क्रू मेंबर्स बेपत्ता झाले होते. दोन क्रू मेंबर्सचे मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आले, मात्र मिशन पायलट राकेश कुमार राणा यांचा शोध सुरूच होता.
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
१० ऑक्टोबर रोजी पोरबंदरच्या नैऋत्येला सुमारे ५५ किमी समुद्रातून राणा यांचा मृतदेह सापडला होता, असे तटरक्षक दलाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सीजी यांनी भारतीय नौदल आणि इतर हितधारकांसह कमांडंट राकेश कुमार राणा हे मिशनचे पायलट कमांडंट होते का याचा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यांच्या पार्थिवावर सेवा परंपरानुसार अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे ३० नॉटिकल मैल अंतरावर मोटार टँकर हरी लीलावरील जखमी व्यक्तीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात चार क्रू सदस्यांसह कोस्ट गार्ड ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर अपघात झाला.
हेलिकॉप्टरमधील चार क्रू मेंबर्सपैकी एक गोताखोर गौतम कुमार यांना तात्काळ वाचवण्यात आले, तर तीन जण बेपत्ता आहेत. एका दिवसानंतर पायलट विपिन बाबू आणि गोताखोर करण सिंह यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण राणा बेपत्ता होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू झाली.