बारामतीमध्ये अजित पवारांच्या झालेल्या विमानअपघातात पायलट शांभवी पाठक हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २५ वर्षीय शांभवी ही मूळची ग्वाल्हेरची होती आणि तिचं बालपण तिथेच गेलं. तिच्या निधनानंतर ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या तिच्या आजी मीरा पाठक यांनी आपल्या लाडक्या नातीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मीरा पाठक यांनी सांगितलं की, शांभवीचा जन्म ग्वाल्हेरमधील मुरार येथे झाला होता. पाचवीपर्यंतचं शिक्षण इथेच पूर्ण केलं. घरातील सर्वजण तिला प्रेमाने 'चीनी' म्हणायचे. कामामुळे तिचं ग्वाल्हेरला येणं कमी झालं असलं, तरी घरातील प्रत्येकाच्या ती जवळ होती. शांभवीच्या रक्तातच देशसेवा आणि उड्डाणाची ओढ होती. तिचे वडील हवाई दलात स्क्वाड्रन लीडर असून ते 'मिराज' सारखी फायटर जेट्स उडवतात.
लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरंच; पायलट शांभवी पाठकच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
आजीला पाठवला होता मेसेज
शांभवीचे आजोबा देखील हवाई दलात ग्राउंड स्टाफ म्हणून कार्यरत होते. शांभवीने ग्वाल्हेरमध्ये असतानाच विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. गेल्या वर्षी आजोबांच्या निधनावेळी ती शेवटची ग्वाल्हेरला आली होती. अपघाताच्या काही काळ आधीच शांभवीने आपल्या आजीला फोनवर मेसेज केला होता. तिने 'Hi Dadda... Good Morning' असा मेसेज पाठवला होता.
"आम्ही झोपडपट्टीवाले, पण लेकीचा सार्थ अभिमान..."; पिंकी मालीच्या वडिलांना अश्रू अनावर
"अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण..."; पिंकीच्या आईचा टाहो
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
आजीने सकाळी फोन पाहिला तेव्हा तिचा मेसेज आलेला होता, पण तोच तिचा शेवटचा मेसेज ठरेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धाकट्या मुलाने फोन करून शांभवी पाठकच्या अपघाताची बातमी दिली. या घटनेमुळे पाठक कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Web Summary : Pilot Shambhavi Pathak, killed in the Baramati plane crash, sent a final 'Hi Dadda' message to her grandmother. The family mourns the loss of the 25-year-old, remembering her passion for flying, inspired by her air force father and grandfather.
Web Summary : बारामती विमान दुर्घटना में मारी गई पायलट शांभवी पाठक ने अपनी दादी को अंतिम 'हाय दादा' संदेश भेजा था। परिवार 25 वर्षीय युवती के नुकसान पर शोक मना रहा है, जो अपने वायु सेना के पिता और दादा से प्रेरित होकर उड़ान भरने के लिए उत्सुक थी।