दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटचे निधन; १९७१ साली झाले होते अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:59 IST2018-03-31T16:59:44+5:302018-03-31T16:59:44+5:30
कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते.

दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटचे निधन; १९७१ साली झाले होते अपहरण
फरिदाबाद- इंडियन एअरलाइन्सचे माजी वैमानिक कॅप्टन एम. के. काचरु यांचे आज दीर्घ आजारने निधन. १९७१ साली इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करुन पाकिस्तानात नेण्यात आले होते. काचरु त्या विमानाचे वैमानिक होते. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
कॅप्टन काचरु २६ प्रवाशांसह विमान घेऊन श्रीनगर ते जम्मू प्रवास करत होते. यावेळेस दोन काश्मिरी तरुणांनी विमानाचे अपहरण करुन त्यांना लाहोरला नेले होते. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री यांनी विमानतळाला भेट देऊन अपहरणकर्त्यांची भेट घेतली होती. या दोन अपहरणकर्त्यांनी भारतातील काही कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती. ही मागणी भारताने धुडकावून लावली होती. भारतीय प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना अमृतसरमार्गे भारतात सुखरुप आणण्यात आले. मात्र, लाहोर विमानतळावरील विमानाला आग लावून देण्यात आली होती. अपहरण करणाऱ्या दोघांची नावे हाशिम कुरेशी आणि अश्रफ कुरेशी अशी होती. भारताने या घटनेनंतर पाकिस्तानच्या विमानांना भारताच्या हवाई सीमेत येण्यास मज्जाव करुन उड्डाणबंदी घातली. ही बंदी १९७१ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत चालली.