उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. ज्या महिलेला डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केलं होतं आणि अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली होती, ती महिला चमत्कारिकरीत्या मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतली आहे. गोकुलपुरम कॉलनीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या विनीता शुक्ला २२ फेब्रुवारी रोजी अचानक घरात बेशुद्ध पडल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेलं, जिथून त्यांना बरेली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
बरेलीच्या रुग्णालयात विनीता यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती आणि शरीर 'ब्रेन डेड' सारख्या स्थितीत पोहोचलं होतं. डॉक्टरांनी कुटुंबीयांना स्पष्ट सांगितलं होतं की, व्हेंटिलेटर काढताच त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अत्यंत जड अंतःकरणाने कुटुंब त्यांना घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेतून निघाले.
२४ फेब्रुवारी रोजी जेव्हा विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणलं जात होतं, तेव्हा घरामध्ये शोकाकुल वातावरण होतं. अंत्यसंस्कारासाठी लाकडांची व्यवस्था करण्यात आली होती, नातेवाईक आणि शेजारी अंत्यदर्शनासाठी दरवाजासमोर जमले होते. मात्र त्याच वेळी नियतीने आपली किमया दाखवली.
रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला जोराचा धक्का बसला होता आणि त्याच कारणामुळे विनीता यांनाही तो झटका बसला. कुटुंबीयांच्या लक्षात आलं की, त्यांना शुद्ध येत आहे. हा चमत्कार पाहून कुटुंबाने त्यांना घरी नेण्याऐवजी तातडीने पीलीभीत येथील 'डॉक्टर राकेश न्यूरो सिटी हॉस्पिटल'मध्ये नेलं. तिथे १४ दिवस झालेल्या उपचारानंतर विनीता यांच्या प्रकृतीत आता खूप सुधारणा झाली. आता त्या बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.
Web Summary : A woman declared brain dead in Uttar Pradesh miraculously revived after a jolt from a pothole during her transport home. After 14 days of treatment, she recovered and returned home, shocking doctors and family.
Web Summary : उत्तर प्रदेश में ब्रेन डेड घोषित एक महिला गड्ढे के झटके से चमत्कारिक रूप से पुनर्जीवित हो गई। 14 दिनों के इलाज के बाद, वह ठीक होकर घर लौट आई, जिससे डॉक्टर और परिवार वाले हैरान रह गए।