शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:54 IST

दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरात आग लागल्यानंतर कोट्यवधींच्या नोटा आढळल्याची चर्चा; अग्निशमन दल म्हणते, जवानांना कोणतीही कॅश मिळाली नव्हती; राज्यसभेतही मुद्दा गाजला

नवी दिल्ली : दिल्लीउच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याचे निमित्त झाले आणि आग विझविताना घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचंड तापला. यामुळे देशभर खळबळ उडाली असून, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने न्या. वर्मा यांची तत्काळ अलाहाबादला बदली केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. अग्निशमन दलाने मात्र कोणतीही कॅश मिळली नसल्याचा दावा केला आहे. 

सरन्यायाधीश खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलावून न्या. वर्मा यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचे आदेश काढले. परंतु, कॉलेजियमचे सदस्य केवळ एवढ्या कारवाईवर संतुष्ट नाहीत. या प्रकरणी न्या. वर्मा यांचा राजीनामा मागितला जावा, असे या सदस्यांचे मत आहे. याप्रकरणी राज्यसभेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

राजीनामा मागा, कॉलेजियम कठोर कॉलेजियमच्या सदस्यांनुसार केवळ बदलीवर हे प्रकरण निपटले तर न्यायपालिकेची प्रतिमा मलिन होईल. यावर गंभीर कारवाई झाली नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल. 

या प्रकरणी न्या. वर्मा यांचा तातडीने राजीनामा मागितला पाहिजे, अशी सदस्यांची भावना. न्या. वर्मा यांनी राजीनामा दिला नाही तर संसदेच्या माध्यमातून त्यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी 

चुकीची माहिती आणि अफवा सर्वोच्च न्यायालयाने निवेदन जारी करत म्हटले की, "न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घडलेल्या घटनेबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जात आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांनी चौकशी सुरू केली, ते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना अहवाल सादर करणार आहेत. 

१४ मार्च रोजी नेमके काय घडले? १४ मार्च रोजी दिल्लीतील निवासस्थानी आग लागली तेव्हा न्या. वर्मा शहराबाहेर होते. कुटुंबीयांनी आगीची माहिती अग्निशामक दल आणि पोलिसांना दिली. आग विझविताना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत रोख रकमेचा मोठा साठा सापडला. 

नेमकी रक्कम किती आहे, हे अजून निश्चित नसले तरी नोटांची ही बंडले पाहून सारेच हादरले. ही माहिती तत्काळ पोलिस आणि सरन्यायाधीशांना देण्यात आली. नंतर मात्र, दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी म्हटले की, आग विझविताना न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात कॅश मिळाली नाही. 

आग लागलेल्या स्टोअर रुममध्ये स्टेशनरी साहित्य व घरगुती सामान होते. १५ मिनिटांत आग आटोक्यात आणली आणि कर्मचारी निघून गेले. तेथे रोख रक्कम वगैरे सापडलेली नाही, असे गर्ग यांनी स्पष्ट केले. 

गर्ग यांनी म्हटले आहे की, आग आटोक्यात आणल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळविण्यात आली आणि त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक तेथून रवाना झाले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीMONEYपैसाFire Brigadeअग्निशमन दल