गुजरातमध्ये पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १४ ठार
By Admin | Updated: November 5, 2016 14:41 IST2016-11-05T14:41:25+5:302016-11-05T14:41:25+5:30
अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका-बागोदरा हायवेवर शुक्रवारी मध्यरात्री एका पिकअप व्हॅनने ट्रॅकला जोरदार धडक दिली.

गुजरातमध्ये पिकअप व्हॅनची ट्रकला धडक, १४ ठार
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ५ - अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलका-बागोदरा हायवेवर शुक्रवारी मध्यरात्री एका पिकअप व्हॅनने ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १४ प्रवासी ठार झाले असून तीन जण जखमी आहेत.
जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त राजकोट जिल्ह्यातील सोखदा गावातील आहेत. पिकअप व्हॅन पंचमहाल पावागड येथून परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. पावागड हे मध्यगुजरातमधील तीर्थस्थळ आहे.