शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकार देतंय ४० हजार रुपये; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य

By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 14:17 IST

pradhanmantri kanya vivah yojana fact check: प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'बद्दल पीआयबीचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर आता एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'शी संबंधित आहे.'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी ४० हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याची माहिती पुढे आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. सरकार मुलींच्या लग्नासाठी पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. सध्या सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य सांगितलं आहे. केंद्र सरकार 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या अंतर्गत मुलींच्या विवाहासाठी ४० हजार रुपये देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र हा दावा बोगस असल्याची माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमनं दिली आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना सरकारनं सुरू केली नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :marriageलग्न