नवी दिल्ली : येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारतीय दूतावास जगातील २० देशांत इतिहासकार बिनॉय के. बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवणार आहे. ‘योग फॉर आॅल, योग फॉर हेल्थ’नामक या प्रदर्शनात भारत, व्हिएतनाम आणि अमेरिकेतील निष्णांत योगतज्ज्ञांच्या ६४ छायाचित्रांचा समावेश आहे. बहल यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. योगदिनी भारतासह जगभरातील ५० देशांत योगावरील एक माहितीपट दाखविला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क) जगभरातील असंख्य लोक मानसिक आणि शारीरिक समस्यांनी ग्रस्त आहेत आणि यावर योग हा एकमेव रामबाण उपाय आहे, असे बहल यावेळी म्हणाले.गत मे महिन्यात आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक माग्रेट चान यांनी जिनेव्हातील डब्ल्यूएचओच्या मुख्यालयी ‘योगा फॉर आॅल, योगा फॉर हेल्थ’ यावरील बहल यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले होते.
‘योग’वर २० देशांत छायाचित्र प्रदर्शन
By admin | Updated: June 16, 2015 02:42 IST