मोदींचे छायाचित्र; माहिती देण्यास पीएमओचा नकार

By Admin | Updated: May 8, 2017 01:40 IST2017-05-08T01:40:27+5:302017-05-08T01:40:27+5:30

जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्याची परवानगी कोणी मागितली होती ही माहिती आम्ही जाहीर करू

Photo of Modi; PMO denial of information | मोदींचे छायाचित्र; माहिती देण्यास पीएमओचा नकार

मोदींचे छायाचित्र; माहिती देण्यास पीएमओचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरण्याची परवानगी कोणी मागितली होती ही माहिती आम्ही जाहीर करू शकत नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. प्रेस ट्रस्ट आॅफ इंडियाच्या बातमीदाराने केलेल्या अर्जाला उत्तर देताना पीएमओने ती माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध नसल्याचे म्हटले. कोणत्या कंपन्या व खासगी व्यक्तींनी मोदी यांचे छायाचित्र वापरण्यासाठी परवानगी मागितली होती याचा तपशील मागण्यात आला होता.

रिलायन्स जिओ आणि पेटीएमने जाहिरीतींमध्ये मोदी यांचे छायाचित्र वापरण्यासाठी परवानगी मागितली होती का, असे विचारले असता पीएमआने त्याच्या नोंदी नाहीत, असे उत्तर दिले.

Web Title: Photo of Modi; PMO denial of information